MPSC परीक्षेत वाडयाचा कु.संकेत अजित ठाकरे दुसरा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (mpsc) आयोजित केलेल्या राज्य सेवा अभियांत्रिकी परीक्षेत कु. संकेत ठाकरे महाराष्ट्रात दुसरा.

MPSC परीक्षेत वाडयाचा कु.संकेत अजित ठाकरे दुसरा
MPSC Exam 2021

MPSC परीक्षेत वाडयाचा कु.संकेत अजित ठाकरे दुसरा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (mpsc) आयोजित केलेल्या राज्य सेवा अभियांत्रिकी परीक्षेत कु. संकेत ठाकरे महाराष्ट्रात दुसरा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (mpsc) आयोजित केलेल्या राज्य सेवा अभियांत्रिकी परीक्षेत कु. संकेत ठाकरे महाराष्ट्रात दुसरा तर obc प्रवर्गात महाराष्ट्र राज्यात प्रथम आला असून त्याला त्याच्या वाढदिवस दिनी मोठ गिप्ट मिळाले असून तो वाडा तालुक्यातील नेहरोली गावाचा रहिवासी आहे. पालघर जिल्हात त्याचा वर अभिनंदना चा वर्षाव होतआहे.

ssc ला मनोर शाळेत होता. 92% मार्क मिळवले होते. 12 वी सायन्स ला ठाणे येथील कॉलेज ला असून त्यांने 12 वी ला सुद्धा 82% मार्क मिळवले होते. त्या नंतर तो नागपूर येथे इंजिनियरिंग  करून त्यांने मुंबई MIT मधे ,एम टेक केल आहे. त्यांने mpsc व रेल्वे ची स्पर्धा परीक्षा 2019 साली दिली होती. 2020 साली संकेत रेल्वे ची परीक्षा पास होऊन त्याच सिलेक्शन झाल होत. आज तो मुंबई येथील cst या ठिकाणी रेल्वेत प्रौबेशन वर असिस्टंट इंजिनियर म्हणून ट्रेनिंग घेत आहे. 2019 साली त्यांने mpsc ची पण परीक्षा दिली होती.mpsc चा निकाल 2020 साली लागून तो मुलाखतीला पात्र ठरला होता.

त्या नंतर आज mpsc चा मुख्य परीक्षा व मुलाखती चा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केला त्यात तो जनरल मेरिट लिस्ट मधे महाराष्ट्रात दुसरा तर obc प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम आला आहे.त्याच्या या यशाचे श्रेय त्याने त्याचे आई-वडील ,गुरुजन, मित्र व नातेवाईक यांना दिले आहे.

पालघर प्रतिनिधी

रवींद्र घरत