मुरबाड तालुक्यात सर्वत्र महावितरण कंपनीच्या वतीने एक गाव एक दिवस अभियान राबवणार - दिलीप भोले 

एक गाव एक योजना राबविणार असे प्रतिपादन कल्याण महावितरण कंपनीचे कार्यकारी अधीक्षक अभियंता दिलीप भोले यांनी मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावात नवीन टाकलेल्या केबलची पाहणी करण्यासाठी आले असतना व नागरिकांशी संवाद साधताना प्रतिपादन केले.

मुरबाड तालुक्यात सर्वत्र महावितरण कंपनीच्या वतीने एक गाव एक दिवस अभियान राबवणार - दिलीप भोले 
MSEDCL Murbad

मुरबाड तालुक्यात सर्वत्र महावितरण कंपनीच्या वतीने एक गाव एक दिवस अभियान राबवणार - दिलीप भोले

एक गाव एक योजना राबविणार असे प्रतिपादन कल्याण महावितरण कंपनीचे कार्यकारी अधीक्षक अभियंता दिलीप भोले यांनी मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावात नवीन टाकलेल्या केबलची पाहणी करण्यासाठी आले असतना व नागरिकांशी संवाद साधताना प्रतिपादन केले.

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार: 

मुरबाड तालुक्यात सर्वत्र ग्रामीण झोन मध्ये यापुढे सर्वच गावांमध्ये गाव आकडा मुक्त करण्यासाठी एक गाव एक योजना राबविणार असे प्रतिपादन कल्याण महावितरण कंपनीचे कार्यकारी अधीक्षक अभियंता दिलीप भोले यांनी मुरबाड तालुक्यातील कोरावळे गावात नवीन टाकलेल्या केबलची पाहणी करण्यासाठी आले असतना व नागरिकांशी संवाद साधताना प्रतिपादन केले.
यावेळी कल्याण ग्रामीणचे कार्यकारी अभियंता राजू रामटेके सरळगाव शाखा अभियंता राजेंद्र शिर्के पत्रकार बाळासाहेब भालेराव, सरपंच योगेश ठाकरे व इतर नागरिक उपस्थित होते तसेच या कोरावळे गावात एकाच आठवड्यात  तीन ते चार डीपी (ट्रांसफार्मर)उडाल्यामुळे सदर गाव हा१७दिवस अंधारात होता.(MSEDCL Murbad)

त्यानंतर या गावांमध्ये तात्काळ केबल टाकण्यासाठी कल्याण ग्रामीण महावितरण कंपनीमध्ये २१ सप्टेंबर  २०२१रोजी  सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेलफेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष तथा पत्रकार बाळासाहेब भालेराव यांनी केबलचा प्रस्ताव कल्याण ग्रामीण झोन मध्ये सादर केला. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी संपूर्ण कोरावळे गावांमध्ये केबल उपलब्ध झाला  या कल्याण ग्रामीण महावितरण झोनचे तात्काळीन अतिरिक्त अभियंता हरिनाथ कुरलल यांनी केबलसाठी चांगले सहकार्य केले तसेच आज पूर्ण  गावामध्ये केबल नवीन टाकण्यात आले आहे. त्यामुळे या कारोवले गावाला तात्काळ ग्रामीण झोनचे सर्व अधिकारीवर्ग यांनी वेळेवर सहकार्य केल्याबद्दल पत्रकार संघातर्फे यांचे आभार मानून त्यांचे स्वागत करण्यात आले.


यावेळी बोलताना अधीक्षक  अभियंता दिलीप भोले यांनी सांगितले की या कोरावळे गावांमध्ये एका आठवड्यात तीन ते चार डीपी उडाल्यामुळे या गावात नव्याने केबल बसविला आहे परंतु या गावात ग्राहकांची असलेली थकबाकी तसेच नल पाणीपट्टीची थकबाकी ही तात्काळ भरण्यात यावी तसेच  ज्यांना-ज्यांना नवीन कनेक्शन हवे ते तात्काळ देण्यात येईल अशी माहिती दिलीप भोले यांनी दिली, तर कार्यकारी अभियंता राजू रामटेके यांनी सांगितले की पाणीपुरवठ्याची जी काही थकबाकी आहे ती लवकरात लवकर ग्रामपंचायतीने महावितरण कंपनीकडे आदा करावी जेणेकरून आम्हाला हे सर्व करण्यास योग्य होईल त्याप्रमाणे या कोराला गावाला चांगले सहकार्य होईल.असे शुभ संकेत कार्यकारी अभियंता राजू रामटेके यांनी कोरावळे नागरिकांना दिले.तसेच कोरावले गावात पाऊस पडत असतानाही वायरमेन बाळू शिंदे यांच्या टीमने चांगली मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे त्यांचे कोरावले परिसरात अभिनंदन होत आहे.(MSEDCL Murbad)

-एक गाव एक योजना द्वारे गावातील महावितरण संदर्भात तात्काळ समस्या  सोडविल्या जातील
-एक गाव एक दिवस योजनेद्वारे गावातील ग्राहकांची थकबाकी बाबत चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येईल.
-हो योजनेद्वारे गावातील विद्युत खांब व विद्युत तार यावर  सुद्धा चर्चा करण्यात येईल.
-जो गाव तालुक्यातील आकडा मुक्त होईल त्या गावात तात्काळ विज कनेक्शन देण्यात येईल.
 दिलिप भोले
 अधीक्षक अभियंता
कल्याण ग्रामीण झोन महावितरण कंपनी