महावितरणच्या विरोधात 28 फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे "जबाब दो" आंदोलन, सामान्यग्राहकांप्रति वीज कंपनीची अन्यायकारक दुटप्पी भूमिका खपऊन घेतली जाणार नाही - लुगडे महाराज

परळी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार "सर्वसामान्यांना त्रास आणि धनदांडग्यांना अभय" अशा पद्धतीचा असून परळीच्या भागाचा विचार केला तर काही ठराविक कंपन्या आणि धनदांडग्या लोकांकडे लाखो रुपयांचे बिल असताना त्यांच्या लाईट कट न करता सर्वसामान्य लोकांच्या दोन - तीन हजार रुपये वीज बिल बाकी साठी कसल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता,नोटीस न पाठवता कडक कारवाई करून लाईट कट करण्याचे प्रकार सर्रास परळीत घडत आहेत.

महावितरणच्या विरोधात 28 फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडचे "जबाब दो" आंदोलन, सामान्यग्राहकांप्रति वीज कंपनीची अन्यायकारक दुटप्पी भूमिका खपऊन घेतली जाणार नाही - लुगडे महाराज
MSEDCL News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 बीड .. परळी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार "सर्वसामान्यांना त्रास आणि धनदांडग्यांना अभय" अशा पद्धतीचा असून परळीच्या भागाचा विचार केला तर काही ठराविक कंपन्या आणि धनदांडग्या लोकांकडे लाखो रुपयांचे बिल असताना त्यांच्या लाईट कट न करता सर्वसामान्य लोकांच्या दोन - तीन हजार रुपये वीज बिल बाकी साठी कसल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता,नोटीस न पाठवता कडक कारवाई करून लाईट  कट करण्याचे प्रकार सर्रास परळीत घडत आहेत.
वीजबिल वसुलीला आमचा विरोध नाही. सर्वसामान्य नागरिकांना  जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून धनदांडग्यांना पूर्णपणे अभय असल्याचा स्पष्ट आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे.(MSEDCL News)

अशा या दुटप्पी भूमिकेच्या  विरोधात सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने "जवाब दो" आंदोलन करण्यात येत असून सर्वसामान्य लोकांनी आपल्या लाईट बिलासंबंधी तक्रारी असतील तर संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयात कळवाव्यात. ग्रामीण भागाचा विचार केला तर शेतकऱ्यांकडून वीज जोडणीसाठी कोटेशन भरून सुद्धा त्यांना वेळेवर कनेक्शन मिळत नाही, डीपी दिली जात नाही. डीपी दिल्यानंतर अनेक गावातील लोकांच्या डीपी जळाल्यानंतर तात्काळ दुसरी डीपी देत नाहीत. दिल्यानंतर वरून दोन तीन हजार रुपये शेतकऱ्यांकडून वसूल केले जातात. शेतकऱ्यावर आणि सर्वसामान्यावर सातत्याने महावितरण अन्याय करत असून याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरत असून तक्रारदार नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे तसेच अनेक वायरमन हे फिल्डवर काम करत नसून प्रत्येकाच्या हाताखाली खाजगी एक एक दोन दोन माणसं कामाला असून पूर्ण कारभार तेच लोक बघत आहेत. अशा परिस्थितीत काही मोठा अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण ? शहराचा विचार केला तर सर्रास लाईट कट करण्याचे प्रकार चालू असून मीटर कट करून पुन्हा जोडणी च्या कामाला हजार पाचशे रुपये घेतल्याशिवाय मीटर जोडणी होत नाही. यामुळे सर्वसामान्यांची लूट होत आहे.

ग्रामीण असो की शहर लाईटचा लपंडाव सर्रास चालू असतो ग्रामीण भागात लाईटचे पोल बऱ्याच ठिकाणी खाली वाकलेले दिसून येतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून परळी शहरात उघड्या असलेल्या डिफेन्स चे प्रमाण खूप मोठे आहे. याकडे महावितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष असून. या निगरगट्ट गेंड्याच्या कातडीच्या महावितरण प्रशासनाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे "जवाब दो" आंदोलन होत असून या आंदोलनात सर्वांनी हजारोच्या संख्येने सामील व्हावे असे आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. या जबाब दो आंदोलनाला समविचारी विविध संघटना पक्षांचा पाठिंबा असून या आंदोलनामध्ये ते सहभागी होणार आहेत. लाईटच्या संदर्भात ज्यांच्या काही तक्रारी आहेत अशा नागरिकांनी  संपर्क करावा. असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज 
मो. 97 67 33 51 67 शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव 8688773877 यांनी केले आहे.(MSEDCL News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/