महावितरणच्या अभियांच्याने काळ्या फिती बांधून केला प्रशासनाचा निषेध

राज्यात कोरोना महामारीने अक्षरश थैमान घातलेले असताना ही महावितरणचे अभियंते कोव्हिड सेंटर रुग्णालय व विलगीकरण कक्ष तसेच सर्व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्याचे काम जीव धोक्यात घालून करीत आहेत.

महावितरणच्या अभियांच्याने काळ्या फिती बांधून केला प्रशासनाचा निषेध
MSEDCL activists protested the administration by tying black ribbons
महावितरणच्या अभियांच्याने काळ्या फिती बांधून केला प्रशासनाचा निषेध
महावितरणच्या अभियांच्याने काळ्या फिती बांधून केला प्रशासनाचा निषेध

महावितरणच्या अभियांच्याने काळ्या फिती बांधून केला प्रशासनाचा निषेध

       

राज्यात कोरोना (corona) महामारीने अक्षरश थैमान घातलेले असताना ही महावितरणचे अभियंते कोव्हिड सेंटर (covid centre) रुग्णालय व विलगीकरण कक्ष तसेच सर्व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्याचे काम जीव धोक्यात घालून करीत आहेत. कोविडची भयानक परिस्थिती असताना देखील ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा. यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या महावितरण (msedcl) विभागाच्या अभियंत्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने संतप्त झालेल्या महावितरणच्या अभियंत्यांनी बुुधवारी काळ्या फिती बांधून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

महावितरण (msedcl) अभियंते प्रशासनाला प्रत्येक गोष्टीत सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत. परंतु प्रशासन अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे उदासीन असल्याने अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने पंधरा टक्के बदल्यांचे परिपत्रक काढले असताना देखील महावितरण प्रशासनाला अजून कनिष्ठ सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्यांसाठी मुहूर्त सापडलेला नाही. तसेच या विभागात अनेक पदांसाठी जागा रिक्त असून त्या त्वरित भरण्यात याव्यात. तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हा निषेध करण्यात आला असून प्रत्येक विभागाच्या गेटसमोर सभा घेण्यात आल्या. आणि प्रलंबित मागण्या त्वरित मान्य न झाल्यास या आंदोलनाची व्याप्ती वाढवून तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यात असा इशारा आनंदोलनकर्त्या अभियंत्यांकडून महावितरणला (msedcl) देण्यात आलाय.

महावितरण (msedcl)पहिलेच आर्थिक अडचणीत असताना व क्षेत्रीय स्तरावर अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. याविषयी महावितरण (msedcl) प्रशासनाला वेळोवेळी सुचविले असून त्यावर उपाय ही सुचविले आहेत. मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे सर्व अभियंत्यामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
          लक्ष्मण राठोड, सहसचिव, एसईए पालघर

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

_______

Also see : आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी परवानग्यांची संख्या कमी करण्यात येणार 

https://www.theganimikava.com/The-number-of-permits-will-be-reduced-to-boost-the-hospitality-sector