सेवाकाळात प्रलोभनाला बळी न पडणे, भ्रष्टाचारमुक्त कर्तव्य करणे हितकारक -मधुकर जावळे

छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना व वंचितांना 50 % टक्के आरक्षण आपल्या करवीर संस्थानात लागू केले व पुढे तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेबांनी एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी व ओबीसी बांधवांना घटनान्मक आरक्षणाची तरतूद केली.

सेवाकाळात प्रलोभनाला बळी न पडणे, भ्रष्टाचारमुक्त कर्तव्य करणे हितकारक  -मधुकर जावळे
Madhukar Jawale News

सेवाकाळात प्रलोभनाला बळी न पडणे, भ्रष्टाचारमुक्त कर्तव्य करणे हितकारक  -मधुकर जावळे

छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना व वंचितांना 50 % टक्के आरक्षण आपल्या करवीर संस्थानात लागू केले व पुढे तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेबांनी एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी व ओबीसी बांधवांना घटनान्मक आरक्षणाची तरतूद केली. 

बीड जिल्हाप्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना व वंचितांना 50 % टक्के आरक्षण आपल्या करवीर संस्थानात लागू केले व पुढे तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेबांनी एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी व ओबीसी बांधवांना घटनान्मक आरक्षणाची तरतूद केली. छत्रपति शाहु महाराजांच्या हेतुचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बहुजनातील व वंचित घटकातील बांधवांना सरकारी, निमसरकारी नोकरीत संधी मिळाली.  अशांनी सेवाकाळातच सामाजिक भान ठेवून कर्तव्य केल्यास सेवानिवृत्तीचा काळ समाजसेवा करण्यात अधिक सोयीचा होतो. असे जिल्हा प्रधान सचिव अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सेवानिवृत्त सहायक नोंदणी महानिरीक्षक मधुकर जावळे यांनी से.ब.अधिकारी-कर्मचारी महासंघ कार्यालय, धानोरा रोड बीड येथे आयोजित केलेल्या जन्मदिन सत्कार प्रसंगी प्रतिपादन केले.(Madhukar Jawale News)

सर्वप्रथम सर्व महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपासक मधुकर जावळे पुढे म्हणाले की सेवाकाळात प्रलोभनाला बळी न पडता नियमाला धरून गरजूंची सेवा प्रामाणिकपणे करावी तसेच भ्रष्टाचार मुक्त राहून सेवेचा व सेवानिवृत्तीनंतर चा काळ विभागीय चौकशी व पेन्शन ला येणा-या अडथळ्या पासून दूर राहणे हितकारक आहे हे पक्के लक्षात ठेवावे. सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्तकांच्या जीवनात एकाकीपणा येऊ नये, त्यांच्या सेवेतील अनुभवाचा सेवारत कर्मचाऱ्यांना लाभ व्हावा व त्यांच्या जीवनातील शेवटच्या पर्वात आनंदी वातावरण राहावे म्हणून उपासक भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव यशवंतराव कदम यांनी सेवा निवृत्तांचा सत्कार करून बहुजन समाज बांधव एकत्रित कसे येतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे कार्यक्रम ते घडवून आणीत आहेत. सत्कार प्रसंगी वाचाल तर वाचाल तर्फे महापुरुष्यांचे जीवन चरित्र देऊन सत्कार केला जातो. असे कार्यक्रम अविरतपणे सुरूच राहतील असे उपासक यशवंतराव कदम व वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयातर्फे सांगण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त उपासक अर्जुन जौजाळ सर,  रघुनाथ शेवाळे, शिवाजीराव पंडित सर, डी.जी. वानखेडे, राउत डी. एम., बी.पी. शिरसट, एस. ए. सोनवणे, दादाराव गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले व जन्मदिवसा निमीत्त उपासक मधुकर जावळे यांच्या सेवाकाळातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्य, कामगार कल्याणासाठी केलेले कार्य, सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक असताना सामाजिक भान ठेवून केलेले बहुमोल कार्याबद्दल माहिती देऊन तसेच उपा. भगवानराव काळे यांच्या न्यायालयातील सेवेबद्दल माहिती दिली व पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा देऊन निरोगी राहून समाजसेवा कशी करता येईल याबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महासंघाच्या कार्याचा आढावा से. ब.अधिकारी - कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन आठवले यांनी घेतला व पुढील नियोजनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास दळवी बि.जी., पंडित प्रभाकर, रेश्मा विद्यागर, विशाल विद्यागर व बहुसंख्य सेवानिवृत् बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महासंघाचे सचिव गुलाब भोले सर यांनी केले.(Madhukar Jawale News)