नगराध्यक्षांच्या हस्ते प्रभाग क्रमांक ०१ आणि ०९ भागात विकास कामांचा शुभारंभ

बीड शहरातील प्रभाग क्रं.०१ व ०९ मधील मधील गजानन कॉलनी, महाराष्ट्र बँक कॉलनी पूर्व बाजू, पश्चिम बाजू येथील नवीन सिमेंट रस्ता व नाली कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.

नगराध्यक्षांच्या हस्ते प्रभाग क्रमांक ०१ आणि ०९  भागात विकास कामांचा शुभारंभ
Maharashtra Bank Colony

नगराध्यक्षांच्या हस्ते प्रभाग क्रमांक ०१ आणि ०९  भागात विकास कामांचा शुभारंभ

बीड शहरातील प्रभाग क्रं.०१ व ०९ मधील मधील गजानन कॉलनी, महाराष्ट्र बँक कॉलनी पूर्व बाजू, पश्चिम बाजू येथील नवीन सिमेंट रस्ता व नाली कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

दि .15 बीड शहरातील प्रभाग क्रं.०१ व ०९ मधील मधील गजानन कॉलनी, महाराष्ट्र बँक कॉलनी पूर्व बाजू, पश्चिम बाजू येथील नवीन सिमेंट रस्ता व नाली कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली असुन,नवीन पाईपलाईन व एल. ई. डी. पथदिवे देखील बसविण्यात आलेले आहेत.याप्रसंगी नगराध्यक्ष बोलतांना म्हणाले की, बीड शहरात विशेष रस्ता अनुदान अंतर्गत अनेक भागात सिमेंट रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सिमेंट रस्त्याचे आणि नालीचे अनेक कामे पूर्ण केली.नंतर मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने आपल्या प्रभागातील कामे रखडली होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने होईल तितक्या लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याकडे भर राहील. जेणेकरून नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही.(Maharashtra Bank Colony)

मागील काही काळात विरोधकांकडून खालच्या पातळीवर जाऊन विकास कामे न करता चालू असलेली कामे अडवली जात होती. स्थानिक आमदार यांच्याकडून जाणीव पूर्वक विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न झाला. नगर पालिकेच्या हद्दीतील कामे आणि निधी बांधकाम विभागाकडे वळविल्यामुळे या कामांना उशीर झाला.त्यामुळे विकासकामे होत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जे काम केले आहे किंवा करत आहोत त्याचे आभार मानण्याची गरज नसून विकास कामे करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले. बीड शहरातील विकास कामांसाठी माजीमंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्याचे देखील सांगितले.

विकासाची ही प्रक्रिया निरंतर चालणारी असुन आगामी काळातही कामे करण्यासाठी प्रयत्नशील राहु असे यावेळी नगराध्यक्षांनी सांगितले.यावेळी नगराध्यक्षांनी विजयादशमी निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी रस्ते,नाल्यांची कामे दर्जेदार करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना केल्या.रस्ते आणि नाल्यांची कामे मार्गी लावल्यामुळे स्थानिक नागरिकांनी व महिलांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर क्षीरसागर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आभार मानले. याप्रसंगी सभापती भास्कर जाधव, किशोर पिंगळे शिवाजीराव जाधव सुभाष सपकाळ सम्राट जाधव धनंजय काळे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.(Maharashtra Bank Colony)