मयत आदित्यला न्याय न मिळाल्यास आदित्यची आई संगीता भोंगळे करणार आत्मदहन

बालमटाकळी येथील आदित्य अरुण भोंगळे या अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या जाचाला कंटाळुन बुधवार दि. ०८ सप्टेंबर २०२१ रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप मयत आदित्यच्या आईने तसेच नातेवाईकांनी केला होता.

मयत आदित्यला न्याय न मिळाल्यास आदित्यची आई संगीता भोंगळे करणार आत्मदहन
Maharashtra Crime News

मयत आदित्यला न्याय न मिळाल्यास आदित्यची आई संगीता भोंगळे करणार आत्मदहन

 बालमटाकळी येथील आदित्य अरुण भोंगळे या अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या जाचाला कंटाळुन बुधवार दि. ०८ सप्टेंबर २०२१ रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप मयत आदित्यच्या आईने तसेच नातेवाईकांनी केला होता.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील आदित्य अरुण भोंगळे या अल्पवयीन मुलाने पोलिसांच्या जाचाला कंटाळुन बुधवार दि. ०८ सप्टेंबर २०२१ रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप मयत आदित्यच्या आईने तसेच नातेवाईकांनी केला होता. दरम्यान  नातेवाईकांकडून आदित्यचा मृतदेह शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आला होता. तसेच जोपर्यंत दोषीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत आदित्यचा मृतदेह शेवगाव पोलिस स्टेशनमधून हलवणार नाही. तसेच अंत्यविधी देखील करणार नाही. असा पवित्रा आदित्यच्या आईसह नातेवाईकांनी घेतला होता. यावेळी नातेवाईकाकडून पोलिसांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती.(Maharashtra Crime News)

त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावाचे बनले होते. परंतु शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे साहेब यांनी या घटनेचा आपण योग्य तो तपास करून संबंधितांवर कारवाई करू असे आश्वासन मयताच्या आईला तसेच नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी मयत आदित्यचा मृतदेह गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी नेला. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी मयत आदित्यची आई संगीता भोंगळे यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शेवगाव याठिकाणी बोलावून आदित्यची आई संगीता भोंगळे यांचा जबाब शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे साहेब यांनी घेतला. दरम्यान मयत आदित्यच्या आईचा जबाब घेऊन एक महिन्याचा कालावधी होण्याच्या मार्गावर असून देखील आजपर्यंत सदरील घटनेतील दोषीं असणाऱ्यावर शेवगाव येथील पोलिस प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. तसेच कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे येत्या रविवार दि. १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत दोषींवर कुठल्याही प्रकारची कारवाई तसेच गुन्हा दाखल न झाल्यास कोणत्याही क्षणी शेवगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे साहेब यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे यावेळी मयत आदित्यची आई संगीता भोंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

सदरील मयत आदित्यची आई संगीता भोंगळे यांनी पोलिसांच्या विरोधात जो जबाब दिला आहे. त्यानुसार आम्ही तपास केला आहे परंतु चौकशी केल्यानंतर अद्यापतरी सदरील पोलिसा विरोधात कुठल्याही प्रकारचे सबळ पुरावे सापडले नसून काहीही निष्पन्न झाले नाही. तसेच लवकरच एक दोन दिवसात आणखी एक दोघांचे जबाब घेणे बाकी आहे. आणी ते जबाब झाल्यानंतर पुढील चौकशी करण्यात येईल आणि नंतर तपासाअंती काही निष्पन्न झाल्यास दोषीं असणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.(Maharashtra Crime News)