लोणारवाडी येथे ग्रामपंचायतची कामेन दिल्याच्या रागातून लोकनियुत्त महिला सरपंचास मारहाण कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा दाखल

कवठेमहांकाळ तालुक्यातील लोणारवाडी येथे ग्रामपंचायतचे शासकीय काम न दिल्याचा राग मनात धरून महिला सरपंच रूपाली मारूती सातपुते यांना मारहाण झाल्याची घटना सोमवार ( दि.११) रोजी दुपारी घडली .

लोणारवाडी येथे ग्रामपंचायतची कामेन दिल्याच्या रागातून  लोकनियुत्त महिला सरपंचास मारहाण कवठेमहांकाळ पोलिसांत  गुन्हा दाखल
Maharashtra Crime News

लोणारवाडी येथे ग्रामपंचायतची कामेन दिल्याच्या रागातून  लोकनियुत्त महिला सरपंचास मारहाण कवठेमहांकाळ पोलिसांत  गुन्हा दाखल

 कवठेमहांकाळ तालुक्यातील लोणारवाडी येथे ग्रामपंचायतचे शासकीय काम न दिल्याचा राग मनात धरून महिला सरपंच रूपाली मारूती सातपुते यांना मारहाण झाल्याची घटना सोमवार ( दि.११) रोजी दुपारी घडली.

सांगली जिल्हा प्रतिनिधी जगन्नाथ सकट:

 कवठेमहांकाळ तालुक्यातील लोणारवाडी येथे ग्रामपंचायतचे शासकीय काम न दिल्याचा राग मनात धरून महिला सरपंच रूपाली मारूती सातपुते यांना मारहाण झाल्याची घटना सोमवार ( दि.११) रोजी दुपारी घडली . याप्रकरणी श्रीकांत माने  बाळू माने राधिका माने  ,सागर माने रमेश शेटे यांच्यावर कवठेमहांकाळ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.(Maharashtra Crime News)


 पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी लोणारवाडी  येथील लोकनियुक्त सरपंच रूपाली सातपुते यांना त्यांच्या राहत्या घरी येवून  गावातीलच बाळू माने व श्रीकांत माने  यांनी ग्रामपंचायतची शासकीय कामे मागीतली होती .यावेळी सरपंच सातपुते यांनी कामे देवू असे सांगीतले मात्र कामेच निघाली नसल्याने त्यांना कामे देता आली नाहीत .यावरून  सातपुते व माने यांच्यात फोनवरून शिवीगाळ व बाचाबाची झाली .यानंतर मात्र सोमवार ( ११) रोजी तहकूब ग्रामसभा पुन्हा आयोजित केली होती.

ग्रामसभा सुरू असताना बाळू माने व त्यांची पत्नी या दोघांनी येवून सरपंचांना खुर्ची  वरून ओढून टेबलावर डोके आदळून जखमी केले आहे .या दरम्यान सरपंच पती मारूती हे मधी आले असता बाळू माने, सागर माने , रमेश मोटे यांनी त्यांना लाथाबुक्यांनी माराहाण करीत शिवीगाळ केली असल्याचे सरपंच रूपाली सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपविभागिय अधिकारी रत्नाकर नवले करीत आहेत.(Maharashtra Crime News)