नामलगाव देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर यांची टाळाटाळ का? फेर रद्द केला म्हणजे उपकार केले का?

बीड तालुक्यातील नामलगाव देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर हे जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलुन दफ्तर दिरंगाई करत असून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत प्रधान सचिव महसुल व वनविभाग मंत्रालय, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना केली आहे.

नामलगाव देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर यांची टाळाटाळ का? फेर रद्द केला म्हणजे उपकार केले का?
Maharashtra Crime News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 बीड जिल्ह्य़ातील ईनामी देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल होत असतानाच बीड तालुक्यातील नामलगाव देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर हे जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलुन दफ्तर दिरंगाई करत असून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत  प्रधान सचिव महसुल व वनविभाग मंत्रालय, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना केली आहे.(Maharashtra Crime News)

बीड तालुक्यातील नामलगाव देवस्थान   जमिन मौजे घोसापुरी ता.जि.बीड येथील २६ एक्कर जमिन बोगस दस्तावेज तयार करून हडपण्यात आली होती याप्रकरणात ग्रामस्थांनी जाहीर बॅनर लाऊन देवस्थानावर दरोडा प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. 

जिल्हाधिका-यांच्या आदेशाला केराची टोपली ;फेरफार रद्द परंतु गुन्हा दाखल करण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई करण्यात येत असून भ्रष्ट जमिन खरेदीदार तसेच महसुल प्रशासनातील आधिका-यांवर मेहेरबान होत उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आहेत, त्यामुळेच त्यांच्यावरच भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करत गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत प्रधान सचिव महसुल व वनविभाग मंत्रालय आणि सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.(Maharashtra Crime News)