कुऱ्हाडीने डोक्यात मारून जिवे मारणाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ५ हजार रूपये दंड

माजलगांव येथील अप्पर सत्र न्यायाधीत श्री. ए. एस. वाघमारे यांनी सदर प्रकरणातील आरोपी सुरेश उर्फ नवनाथ वाघमारे रा. निपाणी टाकळी, ता. माजलगाव जि. बीड दिनांक १२.०९.२०१७ रोजी फिर्यादी हा शेतातून घरी येत असताना आरोपी नामे सुरेश उर्फ नवनाथ वाघमारे आला पुर्वीच्या भांडणावरून कुरापत काडून तु लय माजलास असे म्हणून आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात कुन्हाडीने मारून गंभीर जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

कुऱ्हाडीने डोक्यात मारून जिवे मारणाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व ५ हजार रूपये दंड
Maharashtra Crime News

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

 दि. ३०  माजलगांव येथील अप्पर सत्र न्यायाधीत श्री. ए. एस. वाघमारे यांनी सदर प्रकरणातील आरोपी सुरेश उर्फ नवनाथ वाघमारे रा. निपाणी टाकळी, ता. माजलगाव जि. बीड दिनांक १२.०९.२०१७ रोजी फिर्यादी हा शेतातून घरी येत असताना आरोपी नामे सुरेश उर्फ नवनाथ वाघमारे आला पुर्वीच्या भांडणावरून कुरापत काडून तु लय माजलास असे म्हणून आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात कुन्हाडीने मारून गंभीर जिवे मारण्याचा प्रयत्न केला. व इतर दोन आरोपीनी शिवीगाळ करून मारहाण केली त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेश माजलगाव ग्रामीण येथे गु...नं. २६९/२०१७ कलम ३०७,५०४,५०६.३४ भा.द.वी. प्रमाणे आरोपी चामे सुरेश व ईतर दोन आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.(Maharashtra Crime News)

तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांनी तपास करून मा. न्यायालयात दोषरोप पत्र दाखल केले. सत्र प्रकरण १३/२०१८ मा. न्यायालयात चालून सरकार पक्षाने आरोपीने केलेला गुन्हा सिध्द करण्यासाठी एकुण ०९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या त्यामध्ये जखमी नामे नारायण ज्ञानोबा वाघमारे, इतर तपास अधिकारी सोमनाथ नरके यांचा महत्वपुर्ण जबाब झाले व सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी नामे सुरेश उर्फ नवनाथ वाघमारे रा. निपाणी टाकळी, ता. माजलगाव जि. बीड यास मा. अपर सत्र न्यायालय माजलगांव श्री. ए. एस. वाघमारे यांनी आरोपी क. १ यास कलम ३०७ भा.द.वी. प्रमाणे ५ वांची सक्त मजुरीची शिक्षा व ५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास २ महिन्यांचा साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. व इतर दोन आरोपी यांना पुराव्या अभावी निर्दोष सोडले.

या प्रकरणात अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील श्री आर. ए. वाघमारे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. तसेच अतिरीक्त जिल्हा सरकारी वकिल श्री. एन. एस. पाटील श्री. पी. एन. मस्कर श्री. ए. एस. तांदळे यांनी मदत केली तसेच पैरवी अधिकारी म्हणून पो. हे कॉ जालिंदर वावळकर यांनी व फिर्यादीचे वकील श्री. एल.बी. गवते यांनी साक्षीदार हजर ठेवून विशेष सहकार्य केले.(आर. ए. वाघमारे ) सहा. सरकारी वकील माजलगांव(Maharashtra Crime News)