अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

माजलगाव येथील अपर सत्र न्यायाधीश श्री.एस.पी. देशमुख साहेब यांनी प्रकरणातील आरोपी किसन जगन्नाथ भाव रा. आनंदगाव, ता. माजलगांव, जि. बीड, यास अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व ९,०००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणी सहा, सरकारी वकील श्री. आर.अ.वाघमारे यांनी काम पाहीले.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
Maharashtra Crime News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

माजलगाव येथील अपर सत्र न्यायाधीश श्री.एस.पी. देशमुख साहेब यांनी प्रकरणातील आरोपी किसन जगन्नाथ भाव रा. आनंदगाव, ता. माजलगांव, जि. बीड, यास अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व ९,०००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणी सहा, सरकारी वकील श्री. आर.अ.वाघमारे यांनी काम पाहीले.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

दि. १७.०१.२०२६ रोजी माजलगाव येथील अपर सत्र न्यायाधीश श्री.एस.पी. देशमुख साहेब यांनी प्रकरणातील आरोपी किसन जगन्नाथ भाव रा. आनंदगाव, ता. माजलगांव, जि. बीड, यास अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व ९,०००/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणी सहा, सरकारी वकील श्री. आर.अ.वाघमारे यांनी काम पाहीले.या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, दिनांक १४.०३.२०२१ रोजी दुपारी ०३.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तिचे पती, सासु, सासरे असे घरी असताना त्यादरम्यान पिडीता व तिची बहीण अश्या दोघी जणी शाळांजवळ असणा-या सापश्यावर पाणी आणण्यासाठी गेल्या. थोडया वेळाने फिर्यादीचे गावातील साथीदार हा फिर्यादीचे घरी आला व त्याने सांगितले की मला गाउली साबळे याचा फोन आला होता.(Maharashtra Crime News)

त्याने सांगितले की हापश्या जवळ असणा-या जिल्हा परीषद शाळेतील बाथरूममध्ये फिर्यादीची मुलगी पिडीता हिस गावातील किसन थावरे हा घेऊन गेला होता व मुलगी पावरून बाहेर आली आहे म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे व फिर्यादीच्या पतीला म्हणाला की विलास तु माझ्यासोबत चल आपण बघू त्यानंतर फिर्यादीचे पती तिकडे गेले. तेवढयात फिर्यादीच्या दोन्ही मुली पिडीता व तिची बहीण या पाणी घेउन सुमारे २० मिनिटानंतर घरी आल्या व त्यांनी पिडीतेला काय झाले असे विचारले त्यावर पिडीतेने सांगितले की आम्ही हापश्यावर पाणी भरायला गेलो तेव्हा गावातील त्या माणसांनी माझा हात धरून मला जिल्हा परीषद शाळेतील बाथरूम मध्ये घेऊन गेला व त्याने त्याची पॅन्ट, अँडेल काढून त्याची लघवीची जागा दाखविली व पिडीतेला म्हणाला हातात भर असे म्हणू लागला व पिडीता तेथून पळून आली असे पिडीतेने सांगितले.

अश्या फिर्यादीवरून पोलिस हिंदुड येथे गुन्हा नोंद क. ३९ / २०२१ कलम ३५४,३५४अ भादवि सह कलम ८,१२ बाल

लैगिंक अत्याचार कायदयाप्रमाणे गुन्हा नोंद झाला व तपासानंतर आरोपीविरुध्द माजलगांव येथील मा. सत्र न्यायालयात दोषारोपपत्र

दाखल करण्यात आले. प्रस्तुत प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ०८ साक्षीदार तपासण्यात आले यामधील फिर्यादी, पंच, पिडीता,

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. मा. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून अपर सत्र न्यायाधीश माजलगांव

मा.श्री. एस.पी. देशमुख साहेब यांनी आरोपी किसन जगन्नाथ थावरे यांस भादवीचे कलम ३५४ अन्वये दोषी धरून एक वर्ष सक्त

मजुरी व २०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिण्यांची साधी कैद, कलम ८ बाल लैगिंक अत्याचार अन्वये दोषी धरून

पाच वर्षे सक्त मजुरी व रु. ५०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. तसेच बाल लैंगीक

अत्याचार कायद्याचे कलम १२ अन्वये एक वर्ष सक्त मजुरी व रु. २०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिने साध्या

कैदेची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहा सरकारी वकील श्री. आर.अ. वाघमारे यांनी काम पाहिले व त्यांना सहा. सरकारी वकील श्री पी.एन. मस्कर व श्री. एन.एस.पाटील तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पो.उप.नि.की. सी. जाधवर, सह फौ. जे. एस. वाव्हळकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

(आर.अ. वाघमारे )सहा. सरकारी वकील माजलगांव

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/