१५ लाखाची लाच मागणारा चिंचणीचा भ्रष्ट सरपंच एसीबीच्या जाळ्यात

मागील चार वर्षांपासून भष्ट मार्गाने व पदाचा गैर वापर करत बोगस घरपट्टी, बेवारस व शासकीय जमिनी, विकास निधी यांचा अपहार करून सरपंच असलेल्या कल्पशे धोडीने करोडोंची माया जमल्याचा ग्रमस्थां आरोप

१५ लाखाची लाच मागणारा चिंचणीचा भ्रष्ट सरपंच एसीबीच्या जाळ्यात
Maharashtra Crime News

१५ लाखाची लाच मागणारा चिंचणीचा भ्रष्ट सरपंच एसीबीच्या जाळ्यात

मागील चार वर्षांपासून भष्ट मार्गाने व पदाचा गैर वापर करत बोगस घरपट्टी, बेवारस व शासकीय जमिनी, विकास निधी यांचा अपहार करून सरपंच असलेल्या कल्पशे धोडीने  करोडोंची माया जमल्याचा ग्रमस्थां आरोप

रवींद्र घरत पालघर:

 पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तारापूर लगतच्या चिंचणी ग्रामपंचायतीचा भ्रष्ट सरपंच कल्पेश धोडी याला २० हजारांची लाच घेताना पालघर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. चिंचणी ग्रामपंचायतीचा शिवसेनेचा सरपंच कल्पेश धोडी याची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. चिंचणी ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत बांधकामांना परवानगी, घरपट्टी घोटाळा, ग्रामपंचायत निधीमध्ये अफरातफर,इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार यासारख्या अनेक कारणांमुळे त्याच्याविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. भ्रष्ट कारभारामुळे या सरपंचांविरोधात सदस्यांकडून अविश्वास ठराव देखील आणला गेला होता. आज बोईसर येथील मधुर हॉटेलमध्ये २० हजारांची लाच घेताना या सरपंचाला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.(Maharashtra Crime News)

आरोपी कल्पेश हरेश्र्वर धोडी, वय 35 वर्ष, सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय चिंचणी, ता. डहाणू, रा. शिवाजी चौक चिंचणी, शेतकी सोसायटी गोडाऊन जवळ, चिंचणी, ता. डहाणू, जिल्हा. पालघर यांनी तक्रारदार यांचेकडे 1450000 /- रुपयांची मागणी केली होती. या पैकी 20,000/ रुपये घेताना आज दि.16/02/2022 रोजी 15.57 वा. रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 
यातील तक्रारदार यांनी मौजे चिंचणी, ता. डहाणू येथे जमीन खरेदी केली असून सदर जमिनीवर बांधकाम करण्यासाठी तक्रारदार यांना बांधकाम परवानगी देण्यासाठी तसेच सदर जमिनीवर असलेली स्मशानभूमी बंद करण्यासाठी लोकसेवक यांनी स्वतः करीता तक्रारदाराकडे 1450000/- रुपये लाचेची मागणी केली. परंतू तक्रारदार यांना आरोपित यास लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पालघर येथे तक्रार दिली.

त्यानुसार तक्रारीची  पडताळणी केली असता लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 1450000/- रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 4,50000/- रुपये लाचेची रक्कम दोन दिवसांनी घेण्याचे मान्य करून त्यापैकी आज रोजी एडवांस 20,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर आज रोजी सापळा आजमावला असता सापळा कारवाई दरम्यान आरोपीत लोकसेवक यास 20000/- रु. लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले असून पुढील कारवाई चालू असल्याचे लाच लुचत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे.


                                                                                                     
ही सापळा कारवाई नवनाथ जगताप, पोलिस उपअधीक्षक पालघर यांचे पथकाने, स्वपन बिश्वास, पोलीस निरीक्षक, पोहवा/ नितीन पागधरे, पोहवा/संजय सुतार, पोहवा/ विलास भोये, मपोहवा/ निशा मांजरेकर, पोना/ नवनाथ भगत, पोना/दिपक सुमडा, पोना/अमित चव्हाण, चापोशि/ सखाराम दोडे, यांनी अधिकारी मा. श्री.पंजाबराव उगले, पोलिस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र २.श्री अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र यांचे मार्ग दर्शनाखाली पार पाडली.(Maharashtra Crime News)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/