मित्राची हत्या करुन शरीराचे तुकडे कूपनलिकेत टाकले

दत्तात्रय झांबरे 28 जुलैपासून बेपत्ता होता. दत्तात्रय हा अमोल आणि सागर या दोघांसोबत मद्यपान करत असताना शिवीगाळ करण्यावरुन तिघांमध्ये खटके उडाले.

मित्राची हत्या करुन शरीराचे तुकडे कूपनलिकेत टाकले
Maharashtra Crime News

मित्राची हत्या करुन शरीराचे तुकडे कूपनलिकेत टाकले

दत्तात्रय झांबरे 28 जुलैपासून बेपत्ता होता. दत्तात्रय हा अमोल आणि सागर या दोघांसोबत मद्यपान करत असताना शिवीगाळ करण्यावरुन तिघांमध्ये खटके उडाले.

मित्राची हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मद्यपान करताना शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघांनी मित्राची हत्या केल्याचा आरोप आहे. सांगली जिल्ह्यात क्रौर्याची परिसीमा गाठणारा हा प्रकार घडला.24 वर्षांचा दत्तात्रय शामराव झांबरे हा तरुण 28 जुलैपासून बेपत्ता होता. जवळपास दोन आठवड्यांनी त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलले आहे.(Maharashtra Crime News)

अमोल ऊर्फ धर्मराज आनंदा खामकर  आणि सागर सुरेश सावंत या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे गावामध्ये हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला.दत्तात्रय झांबरे 28 जुलैपासून बेपत्ता होता. दत्तात्रय हा अमोल आणि सागर या दोघांसोबत मद्यपान करत असताना शिवीगाळ करण्यावरुन तिघांमध्ये खटके उडाले. या रागातून अमोल आणि सागर या दोघांनी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. इतक्यावर न थांबता आरोपींनी दत्तात्रयच्या शरीराचे तुकडे केले आणि कूपनलिकेत टाकले.

दत्तात्रयच्या खून प्रकरणी अमोल खामकर आणि सागर सावंत या दोघांनी कबुली दिली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दारुच्या नशेत वादावादी झाल्यानंतर मित्राने तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात घडली होती. राजू वसंत जाधव असे मयत तरुणाचे नाव होते. दारुच्या अड्ड्यावर झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून राजूची हत्या करण्यात आली होती.

ऑनलाईन ल्युडो खेळताना झालेल्या भांडणातून तरुणाने मित्राचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील मालाड परिसरात काही महिन्यांपूर्वी घडला होता. हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही, तर मित्राच्या मृत्यूनंतर बोरिवलीतील एका हॉस्पिटलमधून आरोपीने बनवट मृत्यूचा दाखला बनवून घेतला. मयत तरुणाच्या कुटुंबाला नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवून अंत्यसंस्कारही करण्यात आले.(Maharashtra Crime News)

तरुणाची शोकसभा सुरु असताना उपस्थित राहिलेल्या एका शेजाऱ्याने हा प्रकार सांगितला आणि आरोपीचं बिंग फुटलं