सिरसदेवीत अवैध धंद्यावाल्यांचा सुळसुळाट; अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडे पोलिसांचा कानाडोळा

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये अवैध दारू विक्री, मटका, गुटका  व्हिडिओ गेम, ऑनलाइन मटका खुलेआम सुरू आहेत.

सिरसदेवीत अवैध धंद्यावाल्यांचा सुळसुळाट; अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडे पोलिसांचा कानाडोळा
Maharashtra Crime Newd

सिरसदेवीत अवैध धंद्यावाल्यांचा सुळसुळाट; अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडे पोलिसांचा कानाडोळा

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये अवैध दारू विक्री, मटका, गुटका  व्हिडिओ गेम, ऑनलाइन मटका खुलेआम सुरू आहेत.

बीड जिल्हा प्रतिनिधी
विश्वनाथ शरणांगत यांच्या कडून ...

 गेवराई तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये अवैध दारू विक्री, मटका, गुटका विक्री व्हिडिओ गेम, ऑनलाइन मटका खुलेआम सुरू आहेत. या अवैध धंदेवाल्याकडे पोलीस सोयीस्करपणे कानाडोळा करीत आहे. या अवैध धंदे करणाऱ्यावर पोलिसांची  कसलीही कारवाई केली जात नसल्याने पोलीस प्रशासनावर नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.(Maharashtra Crime News)

सिरसदेवीत मटका,व्हिडीओ गेम,गुडगुडी,ऑनलाइन मटका, गुटखा, देशी व विदेशी दारू विक्री खुलेआम विक्री करत आहेत असे अनेक अवैध धंदे पोलिसाच्या आशीर्वादाने सुरू आहेत . सिरसदेवी मध्ये  गल्लीबोळात सुरू असलेले मटक्याचे अड्डे ,हॉटेल, धाब्यावर मिळणारी बनावट दारू यामुळे तरुनपीडी व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र जास्त आहे .तसेच पोलिस आणि अवैध धंदे चालक यांच्या संगनमताने हे व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे .


 सध्या सिरसदेवी मध्ये दारू पिणाऱ्याची व मटका खेळणाऱ्याची मोठ्या प्रमाणात वाढल्याने या व्यवसायाची चलती आहे . तसेच दारू ,मटका,गुडगुडी, व्हिडीओ गेम ,ऑनलाइन मटका यामुळे अनेक घरात कलह वाढले आहेत. झटपट पैसे मिळवण्याच्या हेतूनं तरुण आणि प्रतिष्ठित नागरिक याकडे वळले आहेत.

सिरसदेवी फाटा आवारात मटका व्यवसाय सुरू असून देशी दारू विक्री खुलेआम सुरु आहे. यामध्ये रोज हजारो रुपयांचा उलाढाल होते. तसेच दारू विक्री करणारे व मटक्याचे अड्डे धनदांडगे यांचे असल्याने कोणीही पोलिसात तक्रार देत नाही.

खुलेआम चालणारा मटका,दारू विक्री ,व्हिडीओ गेम ,ऑनलाइन मटका बंद करावा अशी मागणी जनते मधून जोर धरत आहे. एकीकडे शासन अवैद्य व्यवसाय बंद करण्यासाठी कायदा करते पण त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही.(Maharashtra Crime News)

त्यामुळे अशा धंद्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.