बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व गतवर्षीचा पीकविमा, चालूवर्षी चा पीकविमा तात्काळ देण्यात यावा. अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करण्य येईल----कुलदीप करपे

बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले, ओढे, तलाव, सांडवे, बंधारे, फुटुन प्रचंड प्रमाणात ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. नदी काठच्या शेतीजमीनी पिकांसह खरडून वाहुन गेल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व गतवर्षीचा पीकविमा, चालूवर्षी चा पीकविमा तात्काळ देण्यात यावा. अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करण्य येईल----कुलदीप करपे
Maharashtra Heavy Rains

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व गतवर्षीचा पीकविमा, चालूवर्षी चा पीकविमा तात्काळ देण्यात यावा. अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करण्य येईल-कुलदीप करपे

बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले, ओढे, तलाव, सांडवे, बंधारे, फुटुन प्रचंड प्रमाणात ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. नदी काठच्या शेतीजमीनी पिकांसह खरडून वाहुन गेल्या आहेत.

बीड जिल्हाप्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:


/ दि.17 बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले, ओढे, तलाव, सांडवे, बंधारे, फुटुन प्रचंड प्रमाणात ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. नदी काठच्या शेतीजमीनी पिकांसह खरडून वाहुन गेल्या आहेत. 5 ते 10 फूट खोल जमीन खरडून वाहून गेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुराचे पाणी गावांत घुसल्याने घरे, जनावरे वाहून गेलीत काही ठिकाणी जिवीत हानी सुद्धा झाली आहे. तसेच सखल भागातील जमिनीत पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या स्वरूपात पाणी साचून ऊस, कापूस, सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद आदी पीके संपूर्ण वाया गेली आहेत. नुकसान ग्रस्त भागांचे पंचनामे करण्यास मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी यापूर्वीच महसूल, कृषी, ग्रामविकास, जिल्हा परिषद यंत्रनेला निर्देश दिले असले तरी संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक अद्यापही नुकसान ग्रस्त भागात पोहोचले नाहीत त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पावसाच्या सरासरी नुसार नुकसान सरसकट ग्राहय धरून 100% प्रमुख मागण्या नुकसान भरपाई देण्याची तजवीज तात्काळ करावी.(Maharashtra Heavy Rains)

१) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रु. तात्काळ नुकसानभरपाई द्यावी. २) गतवर्षी चा (2020) चा थकीत खरिप पीकविमा तात्काळ वाटप करावा, ३) पुराने ज्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यांना ऑगस्ट 2019 च्या शासन अध्यादेशा प्रमाणे भरीव नुकसानभरपाई द्यावी.४) चालू वर्षीच्या पीकविमा योजनेतून 25% अग्रीम रक्कम तात्काळ वाटप करुन 100% पीकविमा मंजूर करावा, ५) पुराच्या पाण्याने रस्ते ,पूल वाहुन गेलेत त्यांची नव्याने मंजूरी घेऊन प्रत्यक्ष काम चालु करावे, आवश्यक ठिकाणीपुलांची उंची तात्काळ वाढवून काम चालू करावे. ६) पिककर्ज वाटपाचे उदिष्ट पूर्ती सह वाटपास गती द्यावी. ७) नुकसानग्रस्त शेतकन्यांच्या भरपाई साठी विमा कंपनी कडून लादलेल्या जाचक रद्द करून सरसकट भरपाई देण्यात यावी.

आदी प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर तीन दिवसीय चिंचोटी ता. वडवणी ते हरिष चंद्र पिंपरी चिंचवडगाव देवडी, खळवटलिंबगाव, मोरेवाडी, पिंपरखेड, सळिंबा, मामला. कवडगाव सुर्डी थोटे, पिंपळादेवी. लिंबा रुई, पाटेगाव, संडरवण बेडकूचीवाडी, पिंपळनेर गणपती, बेलवाडी, बाभुलवाडी.ईट, पिंपळगाव महसपुर जवळा, खांडे पारगाव उमरीफाटा, अंथरवण पिंपरीतांडा ते खंडेश्वरी मंदीर आकाशवाणी जुना मोंढा बालाजी मंदिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा, बशीर गंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोडजिल्हाधिकारी कार्यालय अशी 3 दिवसीय 60 की.मी. आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे तरी  या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन नमूद मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल कृपया याची दखल घ्यावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे या प्रसंगी त्यांच्या सोबत सुशीलाताई मोराळे लहू गायकवाड, रामनाथ महाडिक, उद्धव साबळे, सुमंत गोंडे,गोविंद गोंडे, महादेव काळे, रामेश्वर गोंडे, अर्जुन काळे, अंकुश गोंडे, आदी सह महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Maharashtra Heavy Rains)