सरकार पूरबाधितांच्या पाठीशी भक्कमपणे उभे

राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती.

सरकार पूरबाधितांच्या पाठीशी भक्कमपणे उभे
mansoon in maharastra

सरकार पूरबाधितांच्या पाठीशी भक्कमपणे उभे 

राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती.

महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली. महाबळेश्वर आणि नवजामध्ये सर्वाधिक पावसानं हजेली लावली. महाबळेश्वरमध्ये 48 तासांमध्ये 1 हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचं समोर आलं आहे.महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या गावाची ओळख आहे. तर, गेल्या काही वर्षांमध्ये पाथरपुंज येथेही मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याचं समोर आलं आहे.(mansoon in maharastra)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.

 महापूराने पलुस तालुक्यातील तीनही पुलांच्या संरक्षक पाईपचे नुकसान, आमणापूर पूल आज खुला होणार
सांगली पलुस तालुक्यातील महापुराचे पाणी अतिशय मंदगतीने ओसरत आहे.भिलवडी पुलावरुन पाणी ओसरले आहे.पुलावरून दुचाकी व छोट्या चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे.तर आमणापूर अंकलखोप पुलावर सुमारे अर्धा फुट पाणी आहे.

प्रशासनाकडून तपासणी नंतरच आज सकाळपासून औपचारिकरित्या हा आमणापूर पूल सुरू होणार आहे.यामुळे पलुसचा तालुक्याचा दक्षिण भागाशी  तुटलेला संपर्क पुन्हा सुरु होणार आहे.पाणीपातळी ओसरत असताना तालुक्यातील अनेक रस्ते चिखलमय झाले आहेत.पलुस तालुक्यातील पुणदी तर्फ वाळवा येथील पुनदी जुनेखेड पुलावरील पाणी ओसरले आहे.तर महापुराच्या प्रचंड प्रवाहाने सर्वच पुलांच संरक्षक पाईप वाकून मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नदी  काठावरील गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.(mansoon in maharastra)

पुरग्रस्तांना तात्काळ दिलासा देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.