राज्यात दिवसभरात ६ हजार ९४४ रूग्ण करोनामुक्त

राज्यात दिवसभरात ६ हजार ९४४ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ५ हजार ५६० नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यात दिवसभरात ६ हजार ९४४ रूग्ण करोनामुक्त
Maharashtra corona update

राज्यात दिवसभरात ६ हजार ९४४ रूग्ण करोनामुक्त

राज्यात  दिवसभरात ६ हजार ९४४ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ५ हजार ५६० नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र अद्यापही रोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. राज्यात दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होणाऱ्यांपेक्षा कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.आता राज्य सरकारकडून देखील टप्प्याटप्प्याने करोना निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात आहे.(Maharashtra corona update)

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के एवढे झाले आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,६९,००२ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३४३६४ करोनाबाधितांची मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ६४,५७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यातील हॉटेल व्यावसियकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेला आहे.. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. याचबरोबर, सर्व दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली आहे.(Maharashtra corona update)

सिनेमा व मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेशापर्यंत तूर्त तरी सुरू करण्यास परवानगी नाही. धार्मिक स्थळांना देखील तूर्त बंदी असणार आहे.