महारवतन जमिनीची बेकायदेशीर रित्या झालेली खरेदी रद्द करण्यात यावी- उत्तरेश्वर कांबळे

करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना) हद्दीतील गट क्रमांक 135,136,137 ही महारवतन जमिन पोफळज येथील समस्त महार समाजाला देण्यात आली आहे.

महारवतन जमिनीची बेकायदेशीर रित्या झालेली खरेदी रद्द करण्यात यावी- उत्तरेश्वर कांबळे
Maharvatan land Illegal purchase

महारवतन जमिनीची बेकायदेशीर रित्या झालेली खरेदी रद्द करण्यात यावी- उत्तरेश्वर कांबळे

करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना) हद्दीतील गट क्रमांक 135,136,137 ही  महारवतन जमिन पोफळज येथील समस्त महार समाजाला देण्यात आली आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना) हद्दीतील गट क्रमांक 135,136,137 ही  महारवतन जमिन पोफळज येथील समस्त महार समाजाला देण्यात आली आहे.सध्या ती जमिन काही प्रस्थापित लोकांनी बनावट कागद पत्राच्या आधारे दोन गटांचे खरेदीखत व एका गटाचे साठेखत करून घेतले आहे.व सदरच्या जमिनी वहिवाटीत आहेत. ही बेकायदेशीर रित्या झालेली खरेदी असुन ती तात्काळ रद्द यावी अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.निवेदनात नमूद केले आहे की तत्कालीन महसूल आधिकारी यांना हाताशी धरून हा प्रकार झाला आहे.
त्यामुळे गट.क्रमांक 135,136,137 ही जमीन पोफळज येथील समस्त महार समाजाची असुन त्या जमिनीवर बेकायदेशीर रित्या खरेदीखत व साठेखत करून काही लोकांनी ताबा मिळवला आहे.(Maharvatan land Illegal purchase)

त्यामुळे सदर गटातील नोंदी तात्काळ रद्द करून सदरच्या पुर्वरत पुर्वीच्या पोफळज येथील समस्त महार समाजाच्या नावे नोंद कराव्यात आणी संबंधित दोषींवर कारवाई करावी.नोंदी रद्द न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी निवेदनाव्दारे महसुल विभागीय आयुक्त यांना दिला आहे.(Maharvatan land Illegal purchase)