मनुस्मृती दहन केली तरी आज मनु ची मानसिकता समाजात जिवंत आहे एकल महिला संघटना च्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती ग्रंथाला मूठ माती दिली, तिचे जाहीर दहन केले.शूद्रांना व स्रियांना त्यातील नियम बंधनकारक होते.

मनुस्मृती दहन केली तरी आज मनु ची मानसिकता समाजात जिवंत आहे एकल महिला संघटना च्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा
Manusmriti Granth

मनुस्मृती दहन केली तरी आज मनु ची मानसिकता समाजात जिवंत आहे एकल महिला संघटना च्या वतीने स्त्री मुक्ती दिन साजरा

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती ग्रंथाला मूठ माती दिली, तिचे जाहीर दहन केले.शूद्रांना व स्रियांना त्यातील नियम बंधनकारक होते.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती ग्रंथाला मूठ माती दिली, तिचे जाहीर दहन केले.शूद्रांना व स्रियांना त्यातील नियम बंधनकारक होते.मनुस्मृती ग्रंथ मानव जातीला कलंक होता.माणसा माणसात भेदभाव निर्माण करणारा होता.आज ही जाती धर्माच्या नावावर लोकांना भावनिक बनवले जाते. आपल्या देशात जातीय अन्याय, अत्याचार, विषमता जिवंत आहेत तो पर्यंत मनुस्मृती चे दहन करणे आपले कर्तव्ये आहे.(Manusmriti Granth)

मनूने स्रियांना स्वतंत्र नाकारून भोगवस्तू म्हणून हीन व अपमानित करून ठेवले आहे. त्यात पुरुषांनी स्रियांना ताब्यात ठेवले पाहिजे. ती स्वातंत्र्यास पात्र नाही तिनं शिक्षण घेऊ नये. स्त्री दासी आहे. ती पुनर्विवाह करु नये. पुरुषाने कितीही लग्न केले तरी चालेल.निष्क्रिय पुरुष असेल तरी ती त्यापेक्षा कमी आहे. त्या वेळी समतेचा विचार मान्य नव्हता, या अशा अनेक बंधनातून महिलांना मुक्त केले व संविधानामध्ये हक्क व अधिकार महिलांना देण्यात आले. मनुस्मृती जाळन्यामागे एक ग्रंथ जाळणे हा बाबासाहेब यांचा उद्देश नव्हता तर लोकांच्या मनात खोलवर रुतलेली सामाजिक विषमता उचनीचता चे संस्कार जाळायचे होते.

आज मौजे आनंदवाडी ता.बीड या ठिकाणी अःकल महिलांनी एकत्र येऊन  पुन्हा एकदा मनुस्मृती कागदावर लिहून ती जाळली व आनंद साजरा केला.तसेच महिलांना आजच्या युगात त्यांचे हक्क व आधिकार मिळुन देण्याचा निर्धार केला. यावेळी एकल महिला संघटना च्या लिडर्स प्रज्ञा केरे, चंद्रकला खरसाडे, मनीषा खरसाडे, द्वारका करे, शालू खाताळ, लंका करे, राजू खताळ, वनिता खरसाडे,  प्रतीक्षा बाबरे, मीरा माने, स्वाती, शारदा, सह रुक्मिणी नागापूरे,  बीड यांच्या सह आनंदवाडी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.(Manusmriti Granth)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/