वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वैद्यकीय तपासणी शिबीर
सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी वंचित आय केअर सेंटर यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन इंदिरानगर येथे रविवारी करण्यात आले होते.....

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वैद्यकीय तपासणी शिबीर
कल्याण (kalyan) : सध्याची कोरोनाची (corona) परिस्थिती लक्षात घेता नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहरच्या वतीने अमर ज्योती प्रतिष्ठान, हेल्थकेअर आणि आय केअर सेंटर यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर (camp) व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन इंदिरानगर येथे रविवारी करण्यात आले होते.
प्रभाग क्रं. ७३ इंदिरा नगर येथे राजीव नगर, त्रिमूर्ती नगर, शिवशंकर नगर, गौरी शंकरवाडी या परिसरातील नागरिकांची मधुमेह, बी.एम.आय. बॉडीफॅड, रक्तदाब, नाडी परीक्षण, प्रकृती परीक्षण, आहार सल्ला, डोळे तपासणी, मोतीबिंदू तपासणी, सर्दी, खोकला, ताप आदींची मोफत तपसणी करण्यात आली. तसेच नागरिकांना मोफत औषधे देखील देण्यात आली. त्याचप्रमाणे संपूर्ण बॉडी स्कॅनिंग, मशीनद्वारे ब्लड टेस्ट व अल्पदरात चष्मे देखील देण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके, जिल्हा संघटक मिलिंद साळवे, गौतम सुतार, रेखा कुरवारे, रविकिरण मस्के, अशोक गायकवाड, बाजीराव माने, विजय इंगोले आदींनी केले होते.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
_______
Also see : समता सामाजिक फाऊंडेशनच्या वतीने आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस साजरा
https://www.theganimikava.com/Birthday-of-MLA-Kisan-Kathore-on-behalf-of-Samata-Social-Foundation