राज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली...

मुंबई येथे राज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मृद व जलसंधारण विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत आमदार नितीन अर्जुन पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. 

राज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली...
Minister of State The meeting was held under the chairmanship of Hon'ble Shri Dattatraya Bharane Saheb

मुंबई येथे राज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मृद व जलसंधारण विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत आमदार नितीन अर्जुन पवार यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. 

कळवण : मुंबई मंत्रालय येथे राज्यमंत्री मा. नामदार श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मृद व जलसंधारण विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत आमदार नितीन अर्जुन पवार  यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत सुरगाणा तालुक्यातील गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव,को.प. बंधारे इत्यादी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच आदिवासी क्षेत्राच्या सिंचन विकासाकरिता निधी उपलब्ध करून प्रथम प्राधान्याने लपा तलाव सतखांब,  लपा तलान वांगण व इतर लघु प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी दिले.

सध्यास्थितीत सुरगाणा तालुक्यातील लपा योजना राबवितांना ३.५० एम.सी.एफ.टी. पाण्याचे नियोजन आहे ते वाढीव करून सुरगाणा तालुक्यात साठी किमान ५  एम.सी.एफ.टी.पाणी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी यावेळी आमदार नितीन अर्जुन पवार यांनी केली असता राज्यमंत्री यांनी यावर मृद व जलसंधारण विभाग निर्देश  दिलेत. तसेच सुरगाणा तालुक्यातील 10 लपा योजना प्रस्तावित असून त्यांचे अंदाजपत्रक तयार करून शासनस्तरावर तात्काळ सादर करण्याच्या सूचना माननीय मंत्री महोदय यांनी संबंधितांना दिल्या.

सदर बैठकीस मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव कुमार साहेब, मुख्य अभियंता देवराज साहेब, उपवनसंरक्षक अधिकारी नाशिक, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी सुरगाणा तालुक्यातील ज्येष्ठ नेते चिंतामण गावित, गोपाळराव धूम ,युवक काँग्रेस अध्यक्ष राजू पवार, आनंद झिरवाळ ,नवसु गायकवाड, काशीनाथ वाघमारे, युवराज लोखंडे, राकेश दळवी  आदि उपस्थित होते.

 कळवण

प्रतिनिधी - मनोहर गायकवाड

__________

Also see : मुरबाडमध्ये भाजपा महिला आघाडीच्या वतीने  निषेध आंदोलन ! 

https://www.theganimikava.com/Protest-agitation-on-behalf-of-BJP-Womens-Front-in-Murbad