प्रतिकुल परीस्थिती त मोखाड्यातील आदिवासी कलाकारांचा भन्नाट कलाविष्कार जनतेच्या भेटीला

प्रतिकूल परिस्थितीत मोखाडा तालुक्यातील वखारीचा पाडा येथील आदिवासी कलाकारांचा भन्नाट कलाविष्कार जनतेच्या भेटीला आला असल्याची माहीती दि १० आक्टोंबर वार रविवार रोजी मिळाली आहे.

प्रतिकुल परीस्थिती त मोखाड्यातील आदिवासी कलाकारांचा भन्नाट कलाविष्कार जनतेच्या भेटीला
Mokhada Taluka News

माधुरी आहेर प्रतिनिधी मोखाडा:

प्रतिकूल परिस्थितीत मोखाडा तालुक्यातील वखारीचा पाडा येथील आदिवासी कलाकारांचा भन्नाट कलाविष्कार जनतेच्या भेटीला आला असल्याची माहीती दि १० आक्टोंबर वार रविवार रोजी मिळाली आहे. मोखाडा तालुका हा आदिवासी बहुल तालुका असुन अत्यंत दुर्गम व सोयीसुविधांची कमतरता असलेला तालुका आहे.थिएटर, नाट्यगृह अशा कुठल्याही प्रकारच्या मनोरंजनाची सोय तालुक्यात नाही.त्यामुळे गाणे कसे बनवतात याच कुठलेही  मार्गदर्शन या आदिवासी कलाकारांना नसताना वखारीचा पाडा येथील आदिवासी कलाकारांनी अगदी स्तुत्य प्रयत्न करत राणी माझी जाते कॉलेजला हे गीत अभिनयासह बनलेले आहे त्यात याच गावातील कलाकारांनी दिग्दर्शक,गीत गायन व अभिनय व शुटींग केली आहे त्यामुळे सर्वच स्तरांतून या कलाकारांचे कौतुक होत आहे.(Mokhada Taluka News)

जिल्हा परिषद शाळा वखारीचा पाडा या शाळेत या मुलांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे.रमेश देवराम पादीर हा या गीताचा निर्माता व लेखक असुन या गाण्यातील मुख्य कलाकार रमेश पादीर व प्रियंका दिवे हे आहेत सहकलाकार म्हणून मयूर दिवे, हर्षद दिवे, महेश दिवे,जनार्दन दिवे, अपेक्षा वाघ व आकांक्षा वाघ यांनी भुमिका निभावली आहे.(Mokhada Taluka News)