कॉवीड नियमांचे नियमांचे पालन करत मोखाडा तालुक्यातील शाळांची घंटा उत्साहात वाजली

कोवीड नियमांचे पालन करत मोखाडा तालुक्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा दिनांक 4 ऑक्टोबर वार सोमवार रोजी उत्साहात व आनंदाच्या वातावरणात सुरू झाल्या आहेत.

कॉवीड नियमांचे नियमांचे पालन करत मोखाडा तालुक्यातील शाळांची घंटा उत्साहात वाजली
Mokhada taluka Schools

माधुरी आहेर मोखाडा:

कोवीड नियमांचे पालन करत मोखाडा तालुक्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा दिनांक 4 ऑक्टोबर वार सोमवार रोजी उत्साहात व आनंदाच्या वातावरणात सुरू झाल्या आहेत या वेळी गटशिक्षण अधिकारी आर बी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्ताराधिकारी वसंत महाले व विस्तार अधिकारी रामचंद्र शविशे यांनी शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.(Mokhada taluka Schools)

तसेच वसंत महाले व रामचंद्र विशे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप करण्यात आले. एकीकडे आनंदात तर दुसरीकडे काळजी अशा वातावरणात या शाळा सुरू झाल्या असून कायमस्‍वरुपी या शाळा सुरू राहतील असा निर्धार शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे त्यासाठी सातत्याने कोविंड नियमांचे पालन केले जाईल असा संकल्प करण्यात आला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हात सॅनीटाईज करून गुलाब पुष्प देत शिक्षक व शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शिक्षकांशिवाय शिक्षणाची मजाच नाही अशा भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहात.शाळा हेच ख-या अर्थाने आमच्या जीवनाचा आनंद व भवितव्य घडविणारे मंदिर आहे अशा देखील भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.(Mokhada taluka Schools)