31 जानेवारी रोजी परळीत मूकनायक दिनाचे आयोजन, मूकनायक पुरस्कार जाहीर

परळी हजारो वर्षे वंचित, उपेक्षित समाजाचा आवाज बनून नवी क्रांती करणाऱ्या महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक वृतपञाचा मूकनायक दिन परळी येथे 31 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.

31 जानेवारी रोजी परळीत मूकनायक दिनाचे आयोजन, मूकनायक पुरस्कार जाहीर
Mooknayak Award

31 जानेवारी रोजी परळीत मूकनायक दिनाचे आयोजन, मूकनायक पुरस्कार जाहीर

परळी हजारो वर्षे वंचित, उपेक्षित समाजाचा आवाज बनून नवी क्रांती करणाऱ्या महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक वृतपञाचा मूकनायक दिन परळी येथे  31  जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

परळी हजारो वर्षे वंचित, उपेक्षित समाजाचा आवाज बनून नवी क्रांती करणाऱ्या महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक वृतपञाचा मूकनायक दिन परळी येथे  31  जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने देण्यात येणारे मूकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पञकार भवन येथे  31 जानेवारी सकाळी अकरा वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आवाड हे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सिरसाळा सरपंच रामदादा किरवले, माजी उपनगराध्यक्ष अयुबखाॅ पठाण, संभाजी  ग्रामीण पोलीस स्टेशन पो. नि. मारोती मुंडे, वैद्यकीय आधिक्षक डाॅ. अरुण गुट्टे, प्रा. डाॅ. विनोद जगतकर, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे आदि उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मूकनायक पुरस्कार देऊन पञकारांचा गौरव करण्यात येणार आहे.(Mooknayak Award)

 
 मूकनायक पुरस्कार या वेळी दैनिक मराठवाडा साथीचे संपादक सतीश बियाणी, दैनिक लोकाशाचे दिलीप बददर, मानपञचे संपादक बालासाहेब जगतकर, दैनिक जगमिञचे संपादक बालासाहेब कडबाने, दैनिक सुर्योदयचे प्रतिनिधी प्रेमनाथ कदम, दैनिक पुढारीचे प्रा. रविंद्र जोशी, दैनिक गावकरीचे जगदीश शिंदे, दैनिक पुण्यभूमीचे भगवान साकसमुद्रे, दैनिक सिटीजनचे शेख मुकरम, महाराष्ट्र प्रतिमाचे प्रतिनिधी अनुप कुसूमकर तर नवोदित पञकार प्रोत्साहन पुरस्कार महाभारतचे प्रतिनिधी विकास वाघमारे यांना देण्यात येणार आहे.या कार्यक्रमास सर्व पञकार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक दैनिक सम्राटचे तालुका प्रतिनिधी रानबा गायकवाड यांनी केले आहे.(Mooknayak Award)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/