आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

मुंबई मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीने 'इंडियन युनियन मुस्लिम लीग'च्या नेत्यांसमवेत चर्चा केली.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी
Mumbai Municipal Election

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी

मुंबई मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीने 'इंडियन युनियन मुस्लिम लीग'च्या नेत्यांसमवेत चर्चा केली. 

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

मुंबई मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीने 'इंडियन युनियन मुस्लिम लीग'च्या नेत्यांसमवेत चर्चा केली. त्याच प्रमाणे राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांबरोबर ही चर्चा झाली. या चर्चेमधे तीन पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आघाडीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या इतर काही संघटनांच्या बरोबर ही चर्चा सुरू आहे. इतर काही संघटना यामध्ये आगामी काळात सामील होतील.  तशी बोलणी चालू आहेत. साधारणत: जानेवारीच्या मध्यापर्यंत यातील जागावाटप निश्चित करून प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीर करण्यात येईल. या वाटाघाटीं मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर, ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार महेंद्र रोकडे, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई महानगर अध्यक्ष अबुल हसन खान, अब्दुल बारी, प्रोफेसर मापारी यांनी बोलणी करून वाटाघाटी यशस्वी केल्या.(Mumbai Municipal Election)

 

मुस्लिम लीग तसेच राष्ट्रीय जनता दल बरोबर आम्ही ही निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकर भवन या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  आम्ही  मुंबई मनपाची निवडणूक राष्ट्रीय जनता दल व मुस्लिम लीग याना बरोबर घेऊन लढत आहोत. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत एमआयएम बरोबर युती करण्याचा विचार नाही. शिवसेना वा काँग्रेस साठीही आमचे दार उघडे आहे असे एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. 

ओबीसींनी औरंगाबाद लोकसभेत सेक्युलर भूमिकेतून मतदान केले असूनही औरंगाबाद मधे एमायएमने सेक्युलर भूमिकेतून प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर जाता येत नाही. ओबीसींना विश्वास देण्याचे काम एमायएमने केले तर आगामी काळातील निवडणुकांबाबत विचार होऊ शकेल. असेही त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले, ओबीसी ना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी भाजपा सोडून  कोणालाही मतदान केले पाहिजे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पाडल्याशिवाय ओबीसींची जनगणना होणार नाही. असे त्यांनी सांगितले. एमपीएससीची पेपरफुटी प्रकरणी त्यांना विचारले असता परीक्षा घेण्याचे कंत्राट खाजगी संस्थेला का देतात यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एमपीएससी हे बोर्ड रद्द केलं पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

ओबीसीला आरक्षण हवे असेल तर येत्या निवडणुकीत भाजपाला पाडल्याशिवाय गत्यंतर नाही. सर्वोच्च न्यायालयाला हवा असलेला  इम्पीरिकल डेटा हा जनगणनेतूनच मिळू शकतो. कोर्टाने राखीव जागांना विरोध केलेला नाही. राखीव जागांना पाठबळ देणारा मागासलेपणाचे मोजमाप करणारा डेटा जनगणनेतून मिळेल. व हा डाटा सादर केल्यानंतर त्यानंतरच ओबीसींना आरक्षणाचा प्रश्न मोकळा होईल असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही विकासाच्या प्रश्नावरठ लढणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील परिवहन सेवाही तोट्यात चालली असून सरकारकडे धोरणात्मक निर्णय घेण्याची ताकद नाही. आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊन पब्लिक ट्रान्सपोर्ट फायद्यात आणू असेही प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी सांगितले. 

या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, ज्येष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत तसेच राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष विजय कंडारे, मुंबई अध्यक्ष अकबर अली खान, मुंबई युवा अध्यक्ष मुर्तुझा शेख, मुंबई युवा महासचिव सोहेल अन्सारी तसेच  इंडियन युनियन मुस्लिम लीगचे महाराष्ट्र महासचिव सी एच अब्दुल रहमान, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच प्रवक्ते अब्दुल रहमान, कॉल अब्दुल मुल्ला, खजिनदार डॉक्टर इब्राहीम कुट्टी हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.(Mumbai Municipal Election)

❇️Here's you need to see about all daily news and updates around the world❇️

News???? , Blogs???? , Lifestyle????️, Viral news coverage????, technology????, entertainment????, world pandemic☣️, education????, sport ????and all online cultural updates.

????Get on with the ganimikava????

????Join on website????
 https://www.theganimikava.com/

????Join on whatsapp????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????Like on Facebook ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

????Join on Telegram ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Follow on Instagram ????
https://instagram.com/theganimikava?utm_medium=copy_link