समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार, सावध राहण्याच्या सूचना

चक्रीवादळ राज्यात धडकणार नाही, पण समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार, सावध राहण्याच्या सूचना.

समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार, सावध राहण्याच्या सूचना
Mumbai Tauktae Cyclone

समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार, सावध राहण्याच्या सूचना

The sea will be rough, the wind speed will increase, be careful

चक्रीवादळ राज्यात धडकणार नाही, पण समुद्र खवळणार, वाऱ्याचा वेग वाढणार, सावध राहण्याच्या सूचना.

अरबी समुद्रातील तौत्के या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोक नाही. ते महाराष्ट्रात धडकणार नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली. तौत्के हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून हे चक्रीवादळ  गुजरातच्या दिशेने सरकण्यास सुरुवात होईल. त्यामुळे महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा ‘निसर्ग’प्रमाणे थेट परिणाम जाणवणार नाही. 

मात्र, आपण या चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत आहोत. या चक्रीवादळाची सूचना मिळाली तेव्हा आपण रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग प्रशासनाला दिलेल्या सूचनांचे योग्य पालन झाले. या भागातील सर्व मच्छिमार बोटी समुद्रातून परतल्या आहेत, असे शुभांभी भुते यांनी सांगितले.

तौत्के चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नसले तरी किनारपट्टीच्या भागात त्याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे चक्रीवादळा संबधी गावोगाव जनजागृती सुरु आहे. मुंबई,कोकण आणि इतर भागात जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस हे महत्वाचे आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी केले आहे.

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे येत्या 12 तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही भागात ऑरेंज झोनही जारी करण्यात आला आहे.

या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटला आहे. अनेक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळाच्या काळात महाराष्ट्र किनारपट्टीवर 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 14 मे रोजी कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल.

तर 15 मे रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. या चक्रीवादळादरम्यान समुद्र खवळलेला राहील. वाऱ्याचा वेगही प्रचंड असेल.

तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.