मुरबाड भाजपा कार्यकारिणी जाहीर! 

कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हितासाठीच असल्याचे  खासदार कपिल पाटील यांचे प्रतिपादन

मुरबाड भाजपा कार्यकारिणी जाहीर! 
Murbad BJP executive announced!

मुरबाड भाजपा कार्यकारिणी जाहीर! 
         

तर खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत कृषी विधेयकावर तातडीची पत्रकार परिषद

कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हितासाठीच असल्याचे  खासदार कपिल पाटील यांचे प्रतिपादन! 

 
    मुरबाड बदलापूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार व ठाणे ग्रामीण भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन कथोरे व भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत मुरबाड एमआयडीसी हॉल येथे आयोजित केलेल्या मुरबाड तालुका व शहर कार्यकारिणीच्या बैठकीत भास्कर शेठ वडवले यांची मुरबाड तालुका उपाध्यक्ष पदी तर चेतन घुडे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, दिलीप देशमुख, विलास देशमुख, जयवंत कराळे, सिद्धार्थ धनगर अनुसूचित जाती युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकारिणी जाहीर केली
  
यावेळी खासदार कपिल पाटील यांनी नुकताच केंद्रात पारित झालेल्या कृषी विधेयकावर तातडीची पत्रकार परिषद घेऊन हा विधेयक शेतकऱ्यांसाठी कसा सोयीचा ठरणार आहे याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की ज्या दिवशी केंद्रात भाजपचे सरकार आले त्या दिवसापासून भाजपाचे सरकार हे सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन काम करणारे सरकार ठरले आहे तसेच नुकताच लोकसभेत 70 वर्षानंतर पहिल्यांदाच संसदेत कृषी विधेयक मंजूर झाले आहे हे विधेयक शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याची प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली 

यावेळी मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे ,भाजप तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजप नेते लियाकत शेख, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, ठाणे जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे, अनंत कथोरे, मुरबाड पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ, मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष छायाताई चौधरी,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना खासदार कपिल पाटील म्हणाले की ,आपल्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठेत शिवाय अन्य पर्याय उपलब्ध नव्हता तेथे ग्राहक वर्ग फक्त मर्यादित होता शेतकऱ्यांना येणाऱ्या जादा खर्च, लिलावात विलंब, स्थानिक माफियांना सामोरे जावे लागत होते ,मात्र मंजूर झालेल्या विधेयकामुळे कृषी क्षेत्रात निश्चितच बदल घडून येतील ,त्यामुळे बाजार समितीच्या आवारात बसणारा शेतकरी तो आता कोणत्याही प्रकारचा टॅक्स न देता तो बिनधास्त बसू शकतो तसेच मंजूर झालेल्या विधेयकाचे महत्त्व ज्या दिवशी शेतकऱ्याला पटेल तेव्हा शेतकरी म्हणेल मोदी सरकारने चांगले काम केले आहे,असे या विधेयकात मुभा देण्यात आली आहे तसेच काँग्रेस विरोधी पक्ष देशभरात विधेयकाचे राजकारण करत आहे तसेच भाजप करते ते वाईट आणि काँग्रेस करते ते चांगले अशा प्रकारचे राजकारण विरोधी पक्ष काँग्रेस करत आहे अशी खरमरीत टीका भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी केली.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

_________

Also see : बारामतीत 103 हेक्टरमध्ये साकारणार वनउद्यान ; बटरफ्लाय गार्डन, अँम्पीथिएटर ,चिंकारा पार्क, थीम गार्डन सुद्धा होणार   !

https://www.theganimikava.com/Forest-park-to-be-set-up-in-103-hectares-in-Baramati-There-will-also-be-a-Butterfly-Garden-Amphitheater-Chinkara-Park-Theme-Garden