मुरबाड प्राथमिक शिक्षक संघाचा पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यासाठी एक हात मदतीचा

स्व.शिवाजीराव पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मुरबाड यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील महाड येथे 'एक हात मदतीचा 'हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

मुरबाड प्राथमिक शिक्षक संघाचा पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यासाठी एक हात मदतीचा
Murbad Primary Teachers Association

मुरबाड प्राथमिक शिक्षक संघाचा पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यासाठी एक हात मदतीचा

स्व.शिवाजीराव पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मुरबाड यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील महाड येथे 'एक हात मदतीचा 'हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. 

मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:
 
  स्व.शिवाजीराव पाटील प्रणित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मुरबाड यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील महाड येथे 'एक हात मदतीचा 'हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात भयानक पूरपरिस्थिती ओढवली होती.या अस्मानी फटका आपल्या ठाणे जिल्ह्याशेजारील रायगड जिल्ह्यातील काही भागांना बसला.सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड तालुक्यातील अनेक घरे,बाजारपेठा पाण्यात बुडाल्या.अनेकांचे प्रचंड नुकसान झाले.पुरग्रस्तांसाठी शासकीय व समाजसेवी संस्थाकडून मदतीचा ओघही सुरू झाला.(Murbad Primary Teachers Association)

आपणही या सेवाकार्यत सहभागी होऊन संकटात सापडलेल्याना मदतीचा हात द्यावा या उदात्त हेतूने मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. सोमनाथ सुरोशे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. भागवत आण्णा पवार ,ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष श्री.जयवंत मुरबाडे सर तसेच ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री.भगवान भगत सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या सदस्यांनी सव्वा लाखापर्यंत मदत निधी जमा केला.

विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी निसर्ग चक्रीवादळ आपत्तीवेळी सुद्धा मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या सदस्यांनी सुमारे एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले होते.विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविणारे साहित्य अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विध्यार्थ्यांना मिळावे यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बिरवाडी केंद्रातर्गत नांदलवाडी, चौधरवाडी.... आदि वीस शाळेतील विध्यार्थ्यांना प्रत्येकी एक प्रमाणे शुक्रवार दिनांक ८ऑक्टोबर २०२१ रोजी मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सदर शाळांमध्ये शिक्षक संघाच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष जाऊन आकर्षक व टिकाऊ असे दप्तर वाटप करण्याचा कार्यक्रम केला.


याचवेळी रायगड प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र म्हात्रे सर,जुनी पेंशन हक्क समितीचे राज्याध्यक्ष श्री.राजेंद्र फुलवारे सर ,महाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. किशोर खोपकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या सेवाभावी उपक्रमासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. सुभाषदादा पवार, मुरबाड पंचायत समितीचे सभापती मा.दिपकभाऊ पवार,उपसभापती सौ.स्नेहाताई धनगर,मा. गटविकास अधिकारी मा.श्री.अवचार साहेब, गटशिक्षणाधिकारी मा.सौ.लंबाटे मॅडम ,रायगड जिल्हा परिषद सदस्य मा.संजयजी कचरे,रायगड येथील मा.प्रांत अधिकारी,खालापूर येथील मा.तहसीलदार,मा.गटविकास अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.


 या प्रेरणादायी  व सेवाभावी उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे कौतुक होत आहे.
(आमचे आदरणीय शिक्षक नेते व संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष स्व.शिवाजीराव पाटील यांनी आदर्शाची पाऊलवाट आमच्यासाठी करून दिलेली आहे  त्या पाऊलवाटेवरती चालताना त्यांचे असलेले सामाजिक भान,तळमळ,कार्यावरची निष्ठा याचा वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत.आमच्या मदत निधीच्या या आवाहनास  आमचे प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक बंधू-भगिनी हे नेहमी अग्रेसर असतात.त्यांच्या या दातृत्व व संघनिष्ठ भावनेला मी प्रणाम करतो. अशाप्रकारे या सेवाभावी उपक्रमासाठी आर्थिक मदत केलेल्या सर्व शिक्षक सदस्यांचे  विशेषतः  महिला पदाधिकारी या सर्वांना धन्यवाद देतो ????)श्री सोमनाथ सुरोशे, अध्यक्ष मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघ (प्रतिक्रिया)(Murbad Primary Teachers Association)