भिवंडीत दोन वर्षांत २६ बलात्कारांच्या घटनांतील ४ पीडितांची हत्या

भिवंडीत दोन वर्षांत २६ बलात्कारांच्या घटनांतील ४ पीडितांची हत्यासर्वात मोठा रेड लाईट एरिया असलेल्या भिवंडीत गेल्या दोन वर्षात २६ बलात्कारांच्या घटना उघडकीस आल्या असून यापैकी ४ पीडितांची निर्घृणपणे हत्या झाली आहे...

भिवंडीत दोन वर्षांत २६ बलात्कारांच्या घटनांतील ४ पीडितांची हत्या
Murder of 4 victims of 26 rape cases in Bhiwandi in two years

भिवंडीत दोन वर्षांत २६ बलात्कारांच्या घटनांतील ४ पीडितांची हत्या

भिवंडीत दोन वर्षांत २६ बलात्कारांच्या घटनांतील ४ पीडितांची हत्यासर्वात मोठा रेड लाईट एरिया असलेल्या भिवंडीत गेल्या दोन वर्षात २६ बलात्कारांच्या घटना उघडकीस आल्या असून यापैकी ४ पीडितांची निर्घृणपणे हत्या झाली आहे. यामध्ये ३ अल्पवयीन मुलींसह एका महिलेचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या पीडितेवर अत्याचार झाला होता. त्याच पीडितेवर भिवंडीतील एका पोलीस उपनिरीक्षकाने तपासाच्या बहाण्याने बोलवून तिच्यावर अत्याचार केला होता.भिवंडी शहर यंत्रमागनगरी म्हणून ओळखली जाते. देशभरातून या शहरात रोजीरोटीच्या शोधात लाखो कामगार येऊन आपल्या उदारर्निवाह चालवतात. जिल्ह्यातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया याच भिवंडी शहरातील हनुमान टेकडी परिसरात आहे. कोरोनाच्या काळात सरकारने लॉकडाऊन घोषित केला होता. सरकारला साथ म्हणून येथील शेकडो वारांगनांनी लॉकडाऊनच्या काळात स्वतःहून देहविक्रचा व्यवसाय बंद ठेवला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्वाती खान यांनी विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून येथील ६०० महिलांच्या घरोघरी मोफत अन्नधान्याचे वाटप केले. शिवाय २०० महिलांना लघु उद्योगात आणून त्यांना जगण्याचा नवा मार्गही दाखवला. मात्र, शासनाचे या महिलांकडे लक्ष गेले नाही.प्रत्येक राज्यातील रेड लाईट एरियात देहविक्री करणाऱ्या मुली व महिलांना शासनाने शस्त्र परवाना देणे गरजेचे आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्वाती खान यांनी व्यक्त केले आहे.

भिवंडी, ठाणे 
प्रतिनिधी - सत्यवान तरे 

___________

Also see : शहापूरला  गटशिक्षणाधिकारी मिळणार कधी? 

https://www.theganimikava.com/When-will-Shahapur-get-group-education-officer-1710