मृत्यू दर घटवण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'  मोहीम महत्वाची

 मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेची राज्यात सुरवात  झाली.......

मृत्यू दर घटवण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'  मोहीम महत्वाची
My responsibility to reduce mortality is important to my responsibility campaign

मृत्यू दर घटवण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'  मोहीम महत्वाची

 जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ 

        पालघर (palghar) :  मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेची राज्यात सुरवात  झाली असून  प्रशासना कडून ही मोहीम यशस्वीपणे राबवण्या साठी आपले पूर्ण योगदान देणार आहे. जिल्हयातील वाढता मृत्युदर घटवण्यासाठी ही योजना नक्कीच महत्वाची ठरेलं . असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ  यांनी व्यक्त केला.

प्रसिद्धी माध्यमांनी हा उपक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे विनंती वजा आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेच्या प्रसिद्धी साठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हास्तरीय पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.

कोविड -१ ९ (covid 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे . असे असले तरी कोरोनावर (corona) हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे . अशा बदलांचा स्विकार करून , त्या माध्यमातून कोरोनावर (corona) प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हयात ' माझे कुटुंब - माझी जबाबदारी ' मोहीमेचा मोठा वाटा असेल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

जिल्हयातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून आरोग्य तपासणी करणे त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे , आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे , कोविड १९ चे (covid 19) संशयित रुग्ण शोधणे , उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्याविषयी जागृती करणे आदी बाबी या मोहिमेत राबविल्या जाणार आहेत . 

' माझे कुटुंब - माझी जबाबदारी ' ही मोहीम वैयक्तिक , कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत अशी अत्यंत आवश्यक त्रिसुत्रीवर आधारित असणार आहे . नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे , मास्कचा नियमित व योग्य वापर करणे व वारंवार हात स्वच्छ धूणे तसेच निर्जंतुकीकरणाचा योग्य वापर करणे याबाबतचे महत्व नागरिकांना मोहिमेत पटवून दिले जाणार आहे . 

' माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीम जिल्हयातील सर्व नगरपालिका , नगरपंचायत व ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाईल . या मोहिमेंतर्गत सर्व शहरे , गावे , वाडी पाडे  इत्यादीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाईल. जेणेकरून रुग्ण समोर येण्यास व मृत्यूदर घटण्यास निश्चित मदत होईल असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पालघर महेंद्र वारभुवन यांनी व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेस  जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेंरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी,तहसीलदार चंद्रसेन पवार,  सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील व जिल्हयातील वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालघर  
प्रतिनिधी - रवींद्र  घरात

______

Also see : माझे कुटूंब, माझी जबाबदारी अंतर्गत करणार ४ लाख ७६ हजार घरांचे सर्वेक्षण

https://www.theganimikava.com/My-family-will-survey-4-lakh-76-thousand-houses-under-my-responsibility