मुरबाडची आरोग्यसेवाच सलाईन वर असल्याची खंत मांडलीय आरोग्य मंत्र्याकडे राष्ट्रवादी सामाजीक न्यायच्या कार्यकर्त्यांनी

मुरबाड तालुक्यातील शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेच्या बाबतीत अनेक समस्यांचा पाढा मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय विभागाचे अध्यक्ष नामदेव गायकवाड आणि कार्याध्यक्ष विजय घायवट यांनी मंत्रालय मुंबई येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन एका निवेदना द्वारे मांडला आहे.

मुरबाडची आरोग्यसेवाच सलाईन वर असल्याची खंत मांडलीय आरोग्य मंत्र्याकडे राष्ट्रवादी सामाजीक न्यायच्या कार्यकर्त्यांनी
NCP Social Justice Department

ठाणे, मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार:

मुरबाड तालुक्यातील शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवेच्या बाबतीत अनेक समस्यांचा पाढा मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय विभागाचे अध्यक्ष नामदेव गायकवाड आणि कार्याध्यक्ष विजय घायवट यांनी मंत्रालय मुंबई येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन एका निवेदना द्वारे मांडला आहे.मुरबाड तालुक्यातील मुरबाड व टोकावडे येथील येथील ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या असुविधांचा मोठी यादी सामाजीक न्यायच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य मंत्र्याकडे सादर केली.त्यांनी या महत्वाच्या ग्रामीण रुग्णालयांत   स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, तज्ञडॉक्टर्स, अधिपरिचारिका,  वार्ड बॉय,सफाईगार, शिपाई,फार्मासिस्ट इत्यादी पदे  रिक्त आहेत ती लवकर भरावीत.(NCP Social Justice Department)

त्याच प्रमाणे सोनोग्राफी मशीन व ऑक्सीजनचा पुरवठा करणारी मशनरी नसल्याने अनेक गरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. ही दोन्ही ग्रामीण रुग्णालये ग्रामीण भागात असून दररोज आदिवासी, सर्वसामान्य, अपघातग्रस्त, साप-विंचू दंश रुग्ण विषबाधाग्रस्त, अपंग, कुपोषित बालक, कुष्ठरोग रुग्ण, टीबीचे रुग्ण, प्रसूतीसाठीच्या गरीब आदिवासी महिला वर्ग व अनेक आजारांचे रुग्ण उपचारासाठी धाव घेतात.परन्तु या दवाखान्या मध्ये तज्ञ डॉक्टर व अपुरा आरोग्य सेवेतील कर्मचारी नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत.त्या मुळे या दोन्ही ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत व येथील स्थानीक रुग्ण कल्याण समित्या निर्जीव अवस्थेत असून २०१९ च्या अगोदर गठीत केलेल्या टोकावडे व मुरबाड येथील रुग्ण कल्याण समित्या तात्काळ रद्द करून नव्याने स्थापित कराव्यात या व अशा अनेक मागण्यांचे निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना यावेळी देण्यात आले. या विषयावर तात्काळ निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी सामाजीक न्यायच्या पदाधिकारी वर्गाला या वेळी मंत्री टोपे यांनी दिले.

त्याच प्रमाणे राष्ट्रवादी सामाजीक न्यायचे तालुका अध्यक्ष नामदेव गायकवाड, कार्याध्यक्ष विजय घायवट व शिस्टमंडळाने राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ही त्यांच्या मंत्रालयातील दालनात मुरबाडच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या संदर्भात भेट घेऊन परिस्थिती सांगितली .

मुरबाड तालुक्यातील  शिरोशी-शेलगाव २कि.मी. , मांदोशी-शाई ३कि.मी, मांदोशी -मुरब्येवाडी , आळवे -वेळूक रस्त्यांची बांधकामे २५-१५ च्या माध्यमातून मंजूर करावीत या मागणीचे पत्र राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे दालन मंत्रालय मुंबई येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग मुरबाड तालुका अध्यक्ष नामदेव गायकवाड मुरबाड तालुका कार्याध्यक्ष विजय घायवट यांनी दिले आहे.(NCP Social Justice Department)