एन.एम.एम.एस 2021च्या परीक्षेत नागज येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुलचे उत्तुंग यश

श्री सिध्देश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत. दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम.

एन.एम.एम.एस 2021च्या परीक्षेत नागज येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुलचे उत्तुंग यश
NMMS 2021 examination

एन.एम.एम.एस 2021च्या परीक्षेत नागज येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुलचे उत्तुंग यश

श्री सिध्देश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत. दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम.

कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एन एम एम एस परिक्षेत 100 टक्के निकाल लागला असुन या मध्ये एन.एम.एम.एस परिक्षेत श्री सिध्देश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले म्हणून केंद्र शासनाकडून  48,000 रु प्रमाणे शिष्यवृत्ती अर्थात आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती लाभ मिळणार आहे.(NMMS 2021 examination)


 नागज येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आसुन,या विद्यालयाने स्पर्धा परीक्षेतील आपली यशाची परंपरा कायम ठेवलीआहे.


यशस्वी विद्यार्थ्यी पुढीलप्रमाणे:


१) अधिका भगत कोडलकर,
२)संचित रवींद्रनाथ कोळेकर,
३)संस्कार विठ्ठल पाटील,
४)मधुरा प्रकाश देसाई,
५)आकांक्षा दादासाहेब घेरडे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असतानाही या विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.


तसेच गुणवंत विद्यार्थी एस एस सी (१०वी )
परीक्षा 2021 


1)सानीका आप्पासो कर्चे 100. % 
 2) सानिका शशिकांत रुपनर  100.%
3 ) प्रणित जगन्नाथ सोनवणे 98.80%
तसेच एच,एस,सी (12 वि आर्ट) 100 टक्के निकाल या मध्ये 


१)रुपनर प्राजक्ता रावसे- 85.83%
२)साबळे करीना युवराज-85.33%
३)सुर्यवंशी प्राची संतोष-85.16%


 या विद्यार्थ्यांचा 100 टक्के निकाल लागला असुन या विद्यार्थ्यांचे सर्वच परिसरातील ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी नागरिकांतून कौतुक होत आहे.इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सिद्धेश्वर हायस्कूलने दर्जेदार शिक्षणाची पताका कायमस्वरूपी फडकवत ठेवली आहे.त्यामुळेच या विद्यालयाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेतील उच्च पदापर्यंत मजल मारली आहे.(NMMS 2021 examination)

विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.पी.देसाई,पर्यवेक्षक एस.ए.रूपनर, यांच्यासह शिक्षक व पालकांचे यशस्वी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कवठेमंहाकाळ प्रतिनिधी