10 विद्यार्थांना लागण, हॉस्टेलमधील सर्वांची चाचणी होणार
जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामधील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील दहा विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय.

10 विद्यार्थांना लागण, हॉस्टेलमधील सर्वांची चाचणी होणार
जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामधील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील दहा विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय.
जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील दहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्य समोर आलंय. कोरोनाबाधित आढळलेल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये नऊ विद्यार्थिनी तर एक विद्यार्थी आहे. हे सर्व एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी असून कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्येच राहात होते. (Nagpur Corona News)
नागपूर जिल्ह्यातील दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमधील दहा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीय. लागण झालेल्यांमध्ये नऊ विद्यार्थिनी तर एक विद्यार्थी आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत आहे. हे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर सर्वांना मेडिकल कॉलेजला संलग्न असलेल्या शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती सध्या सामान्य असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पन्नास विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवलं
कोरनाबाधित आढळलेल्या दहा विद्यार्थ्यांच्या संपर्कातील सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री नितीन राऊत यांनी तिसऱ्या लाटेच्या पदर्पणाचे सूतोवाच केले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल दहा विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच नागपुरात कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.
नागपुरात दिवसभरात 18 कोरोना रुग्णांची नोंद
दरम्यान नागपुरात आज 18 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर आज एकाचाही मृत्यू झाला नाही. दिसभरात नऊ कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे नागपुरातील रुग्णसंख्या 4 लाख 82 हजार 906 वर पहोचली आहे. तर आतापर्यत एकूण 10 हजार 119 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.(Nagpur Corona News)