नागपुरात तीन दिवसानंतर लॉकडाऊन अटळ?
नागपुरात येत्या तीन दिवसात लॉकडाऊनचे अधिक कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

नागपुरात तीन दिवसानंतर लॉकडाऊन अटळ?
नागपुरात येत्या तीन दिवसात लॉकडाऊनचे अधिक कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.
नागपुरात येत्या तीन दिवसात लॉकडाऊनचे अधिक कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. हे निर्बंध लावताना रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कमी करण्यात येणार आहे. तसेच विकेंडला संपूर्ण लॉकडाऊनही लावण्यात येणार असल्याचं सूतोवाच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. जिल्ह्यात आज सकाळी 13 पॉझिटिव्ह पेशंट आढळले. त्यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. तसेच या 12 रुग्णांनी कोरोनाचे दोन डोस घेतले होते, तरीही त्यांना कोरोना झाला. त्यामुळे बिनधास्त राहू नका. मास्क लावा आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे. तसेच आज 78 सँपल जिनम सिक्वेन्ससाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल काय येतो ते पाहू, असं सांगतानाच जेव्हा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडीवरून दोन आकडीवर जाते तेव्हा कोरोनाचा धोका वाढल्याचं समजून जायचं असतं.(Nagpur Lockdown Updates)
सध्या जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याने खबरदारी घेतली जात आहे, असं राऊत म्हणाले.तिसऱ्या लाटेत आयसीएमआरने ज्या उपयायोजना करायला सांगितल्या आहेत. त्यानुसार तरतुदी करण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी बेड तयार ठेवण्यात आल्या आहेत. दोन डोस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बिनधास्त राहू नका. मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा, गर्दी टाळा, दोन लसी घेतलेल्यांसह सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
सध्या शहरामध्ये डेंग्यू रुग्णवाढ होत असून त्याचे विश्लेषण वैद्यकीय तज्ज्ञाकडून केले गेले. सध्या मेडिकलमध्ये दोनशे खाटा तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेवून कोविडसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची मुबलक व्यवस्था जिल्ह्यामध्ये आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरापर्यंत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची उपलब्धता करण्यात आली आहे. असा आढावा विविध विभागामार्फत सादर करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी उत्सव, सण, कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करणे अत्यावश्यक असल्याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मत व्यक्त केले.
-सर्वांशी चर्चा करून तीन दिवसात निर्बंध लावण्यात येणार आहेत.
- रेस्टारंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू करण्याची मुभा आहे. आता ही मुभा रात्री 8 वाजेपर्यंतच असेल.
-दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री 8 वाजेपर्यंत आहे. आताही वेळ दुपारी 4 पर्यंतचीच असेल.
-जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन लावावा लागणार आहे.
-उत्सावाच्या काळात गर्दी वाढू नये म्हऊन सूचना दिल्या आहेत.
-मेडिकल बीओएम आणि ग्रामीण भागातील माहिती घेतली आहे. त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत.
-तिसरी लाट आली आहे. त्यामुळे निर्बंध कडक केले जात आहेत. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण हे सगळं करत आहोत.
सध्या गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्ण दोन आकडी संख्येत वाढले आहेत. अशीच सुरुवात दुसऱ्या लाटेची देखील झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात जिल्ह्यात झाली आहे, असे समजून उपाययोजना करण्याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एकमत व्यक्त केले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा, अशी सूचना त्यांनी केली. सध्या रात्री दहापर्यंत हॉटेल्स सुरु आहेत. त्यावेळेत कपात करण्याबाबतचे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले.(Nagpur Lockdown Updates)
प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसानंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधाची घोषणा केली जाणार आहे.