नागसेन बुद्धविहारात वर्षावास समापन कार्यक्रम संपन्न

ऑक्टोबर बुधवार रोजी नागसेन बुद्धविहार पालवण चौक बीड येथे वर्षावास समापन कार्यक्रम घेण्यात आला.

नागसेन बुद्धविहारात वर्षावास समापन कार्यक्रम संपन्न
Nagsen Buddha Vihar Varshavas

नागसेन बुद्धविहारात वर्षावास समापन कार्यक्रम संपन्न

ऑक्टोबर बुधवार रोजी नागसेन बुद्धविहार पालवण चौक बीड येथे वर्षावास समापन कार्यक्रम घेण्यात आला.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:


 बीड.दि.२० ऑक्टोबर बुधवार रोजी नागसेन बुद्धविहार पालवण चौक बीड येथे वर्षावास समापन कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात आशा टॉकी चौकातून भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला आयु.गणेशजी वाघमारे नगरसेवक बीड  व भैय्यासाहेब मोरे नगरसेवक बीड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले व  पायी रॅलीला सुरुवात करून नागसेन बुद्धविहारात विसर्जन करण्यात आले.विहारातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन आयु.गणेशजी वाघमारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर पुज्यभंते सुमित बोधी यांना संयोजन समितीच्या वतीने चिवर दान करुन करण्यात आले.तसेच आयु गणेशजी वाघमारे व आयु. डॉ.संतोष वाघमारे यांचे पुष्पहार व पुष्पबुग्गे देवुन स्वागत करण्यात आले.(Nagsen Buddha Vihar Varshavas Varshavas)


पुज्य भंते सुमित बोधी यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करुन धम्मदेशना दिली.धम्मदेशनेमध्ये भगवान बुद्ध यांच्या जन्मा पासुन ते मृत्यु पर्यंत केलेले कुशल कर्म या विषयी सखोल माहिती सांगितली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब ओव्हाळ सरांनी केले तर आभार प्रदर्शन आयु.डॉ.संतोष वाघमारे साहेब यांनी मानले.व सर्वात शेवटी आयु. डॉ.संतोष बाबुराव वाघमारे यांच्या तर्फे भोजनदान देण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहिलेले आयु.उमाजी बापु वाघमारे,प्रा‌‌. विठ्ल गाडे सर,सुधाकर वाघमारे,समाधान जाधव,रोहिदास वाघमारे,आश्रुबा शिंदे,मधुकर गायकवाड, अँड.कल्याण गाडे साहेब,के.बी गायकवाड,ज्ञानोबा पोटभरे, नवनाथ पोटभरे,उजगरे बापु, कुंडलिक सातपुते,भारत माने,गुलाब भोले,प्रा.अशोक गायकवाड, कॅप्टन राजाभाऊ आठवले,योगेश जावळे, बाबुराव गालफाडे, अनंत सरवदे,बी.डी.साळवे,सरवदे नरहरी,नाना मस्के,संजय मिसाळ,राजु कवटेकर,अजय गालफाडे, श्रीमंत उजगरे,सुरवसे मामा,वडमारे ताई,धन्वे ताई, गायकवाड ताई,सविता ओव्हाळ,वर्षा अवचार,कमल गायकवाड,जयश्री वाघमारे,ज्योती जाधव,कांचन गालफाडे,उषा वाघमारे,विजया वाघमारे,वंदना वाघमारे,वंदना मस्के,प्रिती वाघमारे ,रेखा सोनवणे,साळवे ताई,असे अनेक उपासक,उपासिका उपस्थित होते अशा प्रकारे वर्षावासाचा कार्यक्रम संपन्न झाला.(Nagsen Buddha Vihar Varshavas Varshavas)