आता नांदेडवरुन विमानाने तिरुपतीला जाता येणार

आता नांदेड-तिरुपती व्हाया हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे. सध्या नांदेड शहर हे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, कोल्हापूर या महानगरांशी विमानाने जोडले आहे.

आता नांदेडवरुन विमानाने तिरुपतीला जाता येणार
Nanded to Tirupati Flight

आता नांदेडवरुन विमानाने तिरुपतीला जाता येणार

आता नांदेड-तिरुपती व्हाया हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. येत्या 17 ऑगस्टपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे. सध्या नांदेड शहर हे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, कोल्हापूर या महानगरांशी विमानाने जोडले आहे.

आंध्रप्रदेश राज्यातील श्री तिरुपती बालाजी देवस्थानचे  जागतिक पातळीवर अनन्य साधारण महत्व आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो भाविक तिथे जात असतात. तिरुपतीला जाण्यासाठी नांदेडहून विमानसेवा असावी अशी मागणी भाविकांची होती. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण मोठ्या प्रयत्नात होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता नांदेड-तिरुपती व्हाया हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.(Nanded to Tirupati Flight)

येत्या 17 ऑगस्टपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे.नांदेड येथे गुरु-ता-गद्दीच्या काळात 2008 मध्ये श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळाची उभारणी करण्यात आली. या विमानतळावर नाईट लँडींगची सुविधा उपलब्ध आहे. सध्या नांदेड शहर हे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, कोल्हापूर या महानगरांशी विमानाने जोडले आहे. यात आता तिरुपतीची भर पडली आहे.

मंगळवार, बुधवार, गुरूवार या दिवशी हे विमान तिरूपती- हैदराबाद-नांदेड-मुंबई – कोल्हापूर असा प्रवास करून त्याच दिवशी त्याच मार्गाने परतीच्या प्रवासासाठी तिरूपतीकडे निघणार आहे.सदरील तीन दिवशी सायंकाळी 6.10 मिनिटाला हे विमान नांदेड येथून निघून रात्री 9.10 मिनिटाला ते तिरूपती येथे पोहोचेल. तर तिरूपतीहून याच दिवशी सकाळी 7.05 वाजता तिरूपतीहून निघणारे हे विमान नांदेडला सकाळी 10.25 मिनिटाला पोहचणार आहे. त्यानंतर मुंबई – कोल्हापूरसाठी आकाशात झेपावणार आहे.

यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. या विमानाचे किमान भाडे 3,999 रुपये आकारण्यात आले.  पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.नांदेडहून तिरूपतीकडे जाणाऱ्या भाविकांची थेट विमानसेवेची मागणी अनेक दिवसांपासून होती. यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ट्रुजेट विमान कंपनीशी अनेकदा चर्चा केली होती.(Nanded to Tirupati Flight)

त्याचीच फलश्रृती म्हणून सध्या सुरु असलेल्या विमानसेवेचा विस्तार करत ती आता तिरूपतीपर्यंत वाढविण्यात आली आहे.