उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापार्यांना नाशिक पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर साहेबांचा दणका, २ कोटी ७४ हजार रुपये फसवणूक झालेल्या शेतकर्यांना मिळवून दिले परत.

उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापार्यांना नाशिक पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर साहेबांचा दणका, २ कोटी ७४ हजार रुपये फसवणूक झालेल्या शेतकर्यांना परत मिळवून दिले...

उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापार्यांना नाशिक पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर साहेबांचा दणका, २ कोटी ७४ हजार रुपये फसवणूक झालेल्या शेतकर्यांना मिळवून दिले परत.
Nashik Inspector General of Police Dr. traders cheating farmers in North Maharashtra. Dighavkar Saheb's hit, 2 crore 74 thousand rupees returned to the cheated farmers.
उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापार्यांना नाशिक पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर साहेबांचा दणका, २ कोटी ७४ हजार रुपये फसवणूक झालेल्या शेतकर्यांना मिळवून दिले परत.

उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापार्यांना नाशिक पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर साहेबांचा दणका, २ कोटी ७४ हजार रुपये फसवणूक झालेल्या शेतकर्यांना मिळवून दिले परत.

नाशिक :आगमनाच्या महिनाभरातच बळीराजाला लुटणाऱ्या व्यापाऱ्यांचा कर्दनकाळ बनणाऱ्या पोलीस अधीकारी, नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर साहेबांचा झंझावात आता नुसता महाराष्ट्रातच नाही तर साहेबांनी हाताळलेल्या शेतकऱ्यांचा संवेदनशील  विषयावर आजूबाजूच्या अनेक  राज्यांमध्ये चर्चा चालू आहे, आज नाशिक येथे डॉ. प्रतापराव दिघावकर साहेबांनी सदर विषयावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली, महाराष्ट्रामध्ये गेल्या ३ वर्षात तब्बल ५ हजार शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे.शेतकऱ्यांची फसवणूक आणि त्यासंदर्भात पोलिस करीत असलेल्या कार्यवाही बाबत दिघावकर साहेबांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची तब्बल १८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यातील आत्तापर्यंत २ कोटी ७४ हजार रुपये परत मिळाले आहेत. तर ३ कोटी ६५ लाख पैसे परत मिळण्याची हमी मिळाली असल्याचे दिघावकर साहेबांनी स्पष्ट केले आहे.

नाशकात सर्वाधिक तर धुळ्यात सर्वात कमी उत्तर महाराष्ट्रात शेतकरी फसवणुकीचे ५९३ गुन्हे घडले आहेत. नाशिक जिल्ह्यात ५५९, अहमदनगरमध्ये २, जळगाव जिल्ह्यात १७, नंदुरबारमध्ये १३ तर धुळे जिल्ह्यात २ असे गुन्हे घडले आहेत. शेतकऱ्यांची ही फसवणूक आणि पैसे परत मिळविण्यासाठी १० विशेष तपास पथके (एसआयटी) नेमण्यात आली असल्याचे साहेबांनी सांगितले. परराज्यातील व्यापाऱ्यांकडून पैसे मिळविण्याचे प्रयत्न पोलीस करणार आहेत.

९१ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत तर उत्तर महाराष्ट्रात ५ हजार शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांसाठी पोलिस कडक कारवाई करणार आहेत. म्हणूनच फसवणूक करणाऱ्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करणार असल्याचे दिघावकर साहेबांनी सांगितले. आतापर्यंत एकूण ९१ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. १०३ जण पैसे देण्यास तयार झाले आहेत. काही वकीलांनीही याप्रकरणी पुढाकार घेतला असून ते मोफत खटला लढणार आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना चेक दिले. मात्र ते बाऊन्स झाले आहेत. याप्रकरणाचे खटले लढण्याचे वकीलांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात मोठी मदत होणार असल्याचा आशावाद दिघावर साहेबांनी व्यक्त केला आहे. याच बरोबर तरुणांना व्यसनाधीन करणाऱ्या गुटखा माफियांच्या नायनाट ही करणार असल्याचे साहेबांनी सांगितले, आत्तापर्यंत २० दिवसात २.५ कोटींचा गुटखा धाडी टाकून हस्तगत करून गुटखा माफियांवर गुन्हे दाखल केल्याचे साहेबांनी सांगितले, तसेच जिल्ह्यात गुन्हेगार दत्तक योजना राबवून हिस्टरी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात येणार असल्याचे साहेबांनी सांगितले.

सदर पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधवांसमवेत पंचक्रोशीतील शेतकरी देखील उपस्तीत होते व शेतकऱ्यांसाठी साहेबांनी राबवलेल्या स्तुतल्य उपक्रमा नंतर त्यांना त्यांचे व्यापाऱ्यांकडे अनेक दिवसांपासून अटकलेले पैसे साहेबांच्या दणक्यानंतर कसे परत मिळाले असे अनेक अनुभव शेतकऱ्यांनी कथन केलेत, सदर बैठकीत बागलाण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसह शेतकरी मित्र, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बिंदु शेठ शर्मा, टेंबे येथील सरपंच, नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, भाजपाचे जेष्ठ नेत श्री भाऊसाहेब चिला अहिरे, स.ना.पा. नगरसेवक, भाजपा गटनेता श्री महेश देवरे, भाजपा,सोशल मीडिया प्रमुख श्री महेंद्र पवार आदी उपस्तीत होते, श्री बिंदू शेठ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना साहेबांच्या दणक्यानंतर वसूल झालेल्या पैश्यांबद्दल माहिती दिली, सदर बैठकीत उपस्तीत सर्व शेतकरी बांधवांनी डॉ.प्रतापराव दिघावकर साहेबांचे श आभार मानले. 

कळवण

प्रतिनिधी - मनोहर गायकवाड

____________

Also see : पुणे साउंड, इलेक्ट्रिकल्स, जनरेटर, इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशनचा मूकमोर्चा व धरणे आंदोलन

https://www.theganimikava.com/pune-vendor-associations-muk-morcha-and-agitation