18 वर्षीय वेटरची गोळी झाडून हत्या

सोमवारी संध्याकाळी दोघे बाईकस्वार रेस्टॉरंटमध्ये आले होते. चिली पोटॅटो आणि मोमोजची ऑर्डर त्यांनी दिली.

18 वर्षीय वेटरची गोळी झाडून हत्या
New Delhi Crime News

18 वर्षीय वेटरची गोळी झाडून हत्या

सोमवारी संध्याकाळी दोघे बाईकस्वार रेस्टॉरंटमध्ये आले होते. चिली पोटॅटो आणि मोमोजची ऑर्डर त्यांनी दिली.

 रेस्टॉरंटमध्ये वेटरची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत उघडकीस आली आहे. पार्सल नेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी वाद झाल्यानंतर वेटरवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. गोळीबारात 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.दिल्लीतील छावला भागात ही घटना घडल्याची माहिती आहे. खैरा रोडवरील हेव्हन एन रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. सोमवारी संध्याकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास पोलिसांना यासंबंधी फोन आला होता. विकास यादवच्या मालकीच्या या रेस्टॉरंटमध्ये महेश नावाचा 19 वर्षीय तरुण वेटरचं काम करत होता. 23 ऑगस्टला तो एका दिवसाच्या सुट्टीवर होता. त्यामुळे यादव यांनी 18 वर्षीय अमन उर्फ गुलाम साबिर याला कामावर बोलावलं होतं.(New Delhi Crime News)

सोमवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास दोघे बाईकस्वार रेस्टॉरंटला आले होते. चिली पोटॅटो आणि मोमोजची ऑर्डर दिली. ऑर्डरसाठी ते काऊंटरजवळ थांबले असताना अमनही तिथेच होता. तिघांची आपसात काहीतरी वादावादी झाली. त्यानंतर दोघांपैकी एकाने अमनला गोळी मारली आणि दोघं पसार झाले.उपस्थित लोकांनी अमनला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. हत्येचं नेमकं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

पुण्यातील गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये हॉटेल मालकावर कोयत्याने वार केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. दोघे जण बिर्याणी घेण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर मालकाची शाब्दिक आणि किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्या दोघांनी आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्यासारख्या धारदार हत्याराने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला.(New Delhi Crime News)

तेव्हा हॉटेल मालकाच्या शेजारी उभा असलेल्या कामगार इसराफिल हा मध्ये आल्याने तो वार त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसून तो गंभीर जखमी झाला.