वार्ता पावसाची
आज संपूर्ण महाराष्ट्रात सकाळपासूनच पावसाने जोरदार झोडपून काढलं.....

वार्ता पावसाची
आज संपूर्ण महाराष्ट्रात सकाळपासूनच पावसाने जोरदार झोडपून काढलं. सलग आठ तास बारामती तालुका आणि परिसरात तुफान पावसाने हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला. हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली. काढणीला आलेली पिके पावसाने भिजल्याने मोठे नुकसान झालं.तसेच शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली ड्रीप वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी मोठे मोठे साप मृतावस्थेत रस्त्यावर वाहून आले होते.
बारामती
प्रतिनिधी -रूपेश महादेव नामदास
___________
Also see : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बीड मधील दिवंगत समता सैनिकांना अभिवादन संपन्न