वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त पुस्तक वाटप

१५ ऑक्टोबर हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो व याचेच औचित्य साधत जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक गणेश हिरवे यांनी वांद्रे पश्चिम येथील त्यांचे मित्र अनिल राणे  सुनील राणे हे बंधू जे गेल्या २५ वर्षपपासून वृत्तपत्र वेंडर म्हणून कार्यरत आहेत.

वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त पुस्तक वाटप
Newspaper Vendor Day

मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे:

१५ ऑक्टोबर हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो व याचेच औचित्य साधत जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक गणेश हिरवे यांनी वांद्रे पश्चिम येथील त्यांचे मित्र अनिल राणे  सुनील राणे हे बंधू जे गेल्या २५ वर्षपपासून वृत्तपत्र वेंडर म्हणून कार्यरत आहेत त्यांना व त्यांचे या क्षेत्रातील सहकारी गुरव साहेब,नावकाळ वृत्तपत्राचे एरिया मॅनेजर नागेश खांबे यांना आज "संस्कारदीप" हे लोकप्रिय वाचनीय बोधपर पुस्तक भेट म्हणून दिले व आज एकूण २० पुस्तस्क वाटण्यासाठी सुपूर्द करुन हा दिवस एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.आतापर्यंत हिरवे सरांनी विविध सण-उत्सव,घरगुती कार्यक्रम,विविध मैदानी स्पर्धा,विवाह प्रसंग,सभा व नवीन ग्रंथालये अशा ठिकाणी मागील २०-२२ वर्षात साधारण दहा-बारा हजार पुस्तक स्वखर्चाने ववितरण केली असून हा छंद जोपासला आहे.सध्या सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष वाचन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.तेव्हा ही तूट भरून काढण्यासाठी आणि वाचनाने ज्ञान प्राप्त होते,आपली बौद्धिक क्षमता वाढते व दिवसमाजी काहीतरी अखंडित वाचीत जावे या उद्देशानेच आपण हा उपक्रम हाती घेतल्याचे हिरवे सरांनी नमूद केले.(Newspaper Vendor Day)