तरुण उद्योजकांनी पुढे आले पाहिजे:सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश राऊत यांचे प्रतिपादन

नवीन तरुण उद्योजकानी,व्यावसायिकानी पुढे यायला हवे असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार श्रीनिवास वनगा यांचे स्वीय सहाययक निलेश राऊत यांनी व्यक्त केले.

तरुण उद्योजकांनी पुढे आले पाहिजे:सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश राऊत यांचे प्रतिपादन
Nilesh raut news

देशाच्या आणि राज्यांच्या जडण घडणीत तरुणांना वाव असून नवीन तरुण उद्योजकानी,व्यावसायिकानी पुढे यायला हवे असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार श्रीनिवास वनगा यांचे स्वीय सहाययक निलेश राऊत यांनी व्यक्त केले.(Nilesh raut news)

पालघर येथील तरुणांनी एकत्र येत 'अकाउंट अन्नट्स टॅक्स कंसंलटिंग' कार्यालय सुरू केलं त्याचा उदघाटन सामाजिक कार्यकर्ते निलेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

गौरव शुक्ला, सुभाष शेट्टी आणि लोकेश शेखावत या तरुणांनी एकत्रित आयकर,जीएसटी व इतर शासकीय,व्यावसायिक कर विषयक कार्यप्रणाली तसेच विविध शासकीय कर्ज प्रकरणे आदी बाबत मार्गदर्शन व कामे कार्यालयाची सुरुवात पालघर माहीम रोड येथील ओशन पेरल या कार्यालयातुन करण्यात येणार आहेत.

दरम्यान तरुणांनी असे एकत्र येऊन आपल्या रोजगार निर्मितीस चालना दिली पाहिजेत,आणि स्वयं रोजगार निर्मिती सोबत इतर नवतरुणांना सुद्धा मदद केली पाहिजेत असे यावेळी निलेश राऊत यांनी या प्रसंगी सांगितले. शासनाच्या विविध योजनांची माहिती व कर्ज प्रकरणे प्रक्रिया याबाबत सर्व सामान्य नागरिकांना या कार्यालयातुन लाभ मिळू शकेल.याप्रसंगी उचित पाटील,शेखर पाटेकर , हरीश वझे आदी सह अनेक जण उपस्थित होते.(Nilesh raut news)

पालघर रविंद्र घरत