युवा नेते नितीन शिंदे यांनी प्रभाग 14 मध्ये ठेवलेल्या लसीकरण शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

देशामध्ये आणि राज्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तिसरी लाट येण्याचा धोका शासकीय यंत्रणांनी दर्शवला आहे.

युवा नेते नितीन शिंदे यांनी प्रभाग 14 मध्ये ठेवलेल्या लसीकरण शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
Nitin Shinde News

युवा नेते नितीन शिंदे यांनी प्रभाग 14 मध्ये ठेवलेल्या लसीकरण शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

देशामध्ये आणि राज्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तिसरी लाट येण्याचा धोका शासकीय यंत्रणांनी दर्शवला आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

देशामध्ये आणि राज्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तिसरी लाट येण्याचा धोका शासकीय यंत्रणांनी दर्शवला आहे त्यापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  कोरोनाची लस घेणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे लसवंतांनी लस घेणे हा आयुष्यवंत होण्याचा राजमार्ग आहे असे प्रतिपादन परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा विजय मुंडे यांनी परळी शहरातील प्रभाग 14 मध्ये घेण्यात आलेल्या लसीकरण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.(Nitin Shinde News)


     युवा नेते नितीन शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रभाग 14 मध्ये लसीकरण शिबिर संपन्न झाले . त्यात दुपारपर्यंत 260 हून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले. प्रभाग 14 मधील सर्वेश्वर नगर, पेठ मोहल्ला, नेहरू चौक, पेठ गल्ली ,वाकडे गल्ली ,ठाकूर गल्ली आणि भारती मठ येथील नागरिकांसाठी कोव्हिड-19 शिबिर घेण्यात आले त्याला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात नागरिकांना कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सीनचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला तसेच परळी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप घुगे स्टाफ नर्स शिवाजी वैद्य ,श्रीमती आडसुळ मॅडम , नर्सेस आणि कर्मचारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


  यावेळी ह.भ.प.भरत महाराज जोगी, ऍड मनोज संकाये, प्रा. संदिपान मुंडे ,विश्वनाथ देवकर ,रघुनाथ डोळस ,नागेश व्हावळे,किशोर जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून शिबिरास उपस्थित होते तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी दत्ता महाराज जोगी, शुभम शिंदे ,अमोल गंगावणे ,रोहित भूमकर ,विशाल चव्हाण, आकाश गंगावणे ,माऊली वाघमारे ,संदीप काळे ,सुदर्शन विभुते ,अमोल वाघमारे ,शिवाजी तटाळे , इंद्रजीत विभुते, शंकर वाघमारे , राहुल विभुते ,गोपाळ ठाकूर ,दीपक नागेश्वर आदींनी परिश्रम घेतले.(Nitin Shinde News)