मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, न्युरोसर्जन व फिजीओथेरपी तज्ञ डॉक्टर एकाच छताखाली उपलब्ध 

बीड जिल्ह्यातील अर्धांगवायू मणक्याचे आजाराचे निदान या वरील उपचार व मार्गदर्शन करण्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन न्युरोसर्जन व फिजिओथेरेपी तज्ञ यांच्या उपस्थितीत केलेले आहे.

मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, न्युरोसर्जन व फिजीओथेरपी तज्ञ डॉक्टर एकाच छताखाली उपलब्ध 
Organizing free health camps

मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, न्युरोसर्जन व फिजीओथेरपी तज्ञ डॉक्टर एकाच छताखाली उपलब्ध

बीड जिल्ह्यातील अर्धांगवायू मणक्याचे आजाराचे निदान या वरील उपचार व मार्गदर्शन करण्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन न्युरोसर्जन व फिजिओथेरेपी तज्ञ यांच्या उपस्थितीत केलेले आहे.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

दि .9 बीड जिल्ह्यातील अर्धांगवायू मणक्याचे आजाराचे निदान या वरील उपचार व मार्गदर्शन करण्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन न्युरोसर्जन व फिजिओथेरेपी तज्ञ यांच्या उपस्थितीत केलेले आहे.डॉ. विशाल पिंगळकर यांच्या वतीने  यामध्ये अर्धांगवायु (पॅरालिसिस), रिहॅबीलीटेशन, बेन स्ट्रोक/ हॅमरेज, मणक्याची गादी सरकणे, मणक्यात गॅप असणे, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, हात पाय कंबर बधिरता, हातापायास मुंग्या येणे, फिट्स येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, स्मृतीभ्रंश, कंपवात इत्यादी या आजारावरील उपचार व मार्गदर्शन मोफत करण्यात येणार आहे.(Organizing free health camps)

पुणे ससून हॉस्पिटल येथे शिक्षण झालेले न्यूरोसर्जन डॉ. विशाल पिंगळकर हे फिजिओथेरपी तज्ञ डॉ. मितेश गवते, डॉ. सुरज मनसबदार यांच्या उपलब्धतेसह अनेक सुविधा या शिबिरात उपलब्ध असणार आहेत. ट्रॅक्शन, टेक्नस, आयएफटी, मसल स्टीग्युलेशन, अल्टासाऊंड तसेच व्यायामाचे मार्गदर्शन यावेळी सर्व गरजुवंतांना करण्यात येणार आहे.वरील आजाराशी संबंधित सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. विशाल पिंगळकर (न्युरोसर्जन) यांनी केली आहे. दि.१०/१०/२०२१ रोजी सकाळी १०:०० ते सायं ६:०० यावेळेत अक्षय क्लिनिक माने कॉम्प्लेक्स,बीड याठिकाणी शिबिरास उपस्थित रहावे.तसेच या शिबिरास येण्यापूर्वी ८२०८९५२४४२ या क्रमांकावर नावं नोंदणी करावी असेही आवाहन शिबीर समितीकडून करण्यात आले आहे.(Organizing free health camps)