गरीबांना मोफत घरगुती सिलेंडर

दारिद्य्ररेषेखालील कुटुंब आणि गरीबांसाठी सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच प्रारंभ होणार आहे.

गरीबांना मोफत घरगुती सिलेंडर
PM Ujjwala Yojana

गरीबांना मोफत घरगुती सिलेंडर

दारिद्य्ररेषेखालील कुटुंब आणि गरीबांसाठी सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच प्रारंभ होणार आहे.

दारिद्य्ररेषेखालील  कुटुंब आणि गरीबांसाठी सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला.उत्तर प्रदेशातील महोबा येथील गरीब कुटुंबांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते मोफत गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आले. 2016 मध्ये पहिल्यांदा उज्ज्वला योजना सुरु करण्यात आली होती.(PM Ujjwala Yojana)

दारिदय्ररेषेखाली असणाऱ्या कुटुंबातील 5 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारकडून ठेवण्यात आले होते. एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी यामध्ये सात श्रेणीतील महिलांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी निर्धारित लक्ष्य 8 कोटीपर्यंत वाढवण्यात आले.उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थी फक्त महिला असतील. गरीब कुटुंबातील महिला या योजनेसाठी नोंदणी करु शकतात. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 वर्षे असले पाहिजे. एकाच घरात उज्ज्वला योजनेची एकापेक्षा जास्त कनेक्शन्स नसावीत.

उज्ज्वला योजनेसाठी E-KYC अनिवार्य आहेत. आधारकार्ड हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच द्रारिद्य्ररेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी सरकारकडून देण्यात आलेले केशरी रेशनकार्डही गरजेचे आहे. लाभर्थी कुटुंबातील सदस्यांची ओळखपत्रेही गरजेची आहेत. कुटुंबातील महिलेच्या बँक खात्याचा क्रमांक आणि IFSC कोड देणे बंधनकारक असेल.उज्ज्वला 2.0 च्या लाभार्थी कुटुंबांना पहिल्यांदा मोफत भरलेले गॅस सिलिंडर मिळणार आहे. याशिवाय, नावनोंदणी प्रक्रिया अधिक सोपी आणि कमी कागदोपत्री ठेवण्यात आली आहे.(PM Ujjwala Yojana)

स्थलांतरित कामगारांना याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही.