केळवारोड झांझरोळी ते बंदाठे रस्त्याबाबत आमदारांना कृती समिती केळवारोड मार्फत दिले निवेदन

पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा निवडून आल्यानंतर केळवारोड विभागात प्रथमच केळवारोड पुर्व पिलाजी नगर येथे शाळेच्या उद्घाटनप्रसंगी दौरा असल्याचे समजल्यानंतर अर्ध्या रस्त्यात कृती समिती केळवारोड समिती अध्यक्ष, सदस्य व नागरीकांनी आमदारांची भेट घेतली.

केळवारोड झांझरोळी ते बंदाठे रस्त्याबाबत आमदारांना कृती समिती केळवारोड मार्फत दिले निवेदन
Palghar Assembly MLA Srinivasa Vanaga

केळवारोड झांझरोळी ते बंदाठे रस्त्याबाबत आमदारांना कृती समिती केळवारोड मार्फत दिले निवेदन

पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा निवडून आल्यानंतर केळवारोड विभागात प्रथमच केळवारोड पुर्व पिलाजी नगर येथे शाळेच्या उद्घाटनप्रसंगी दौरा असल्याचे समजल्यानंतर अर्ध्या रस्त्यात कृती समिती केळवारोड समिती अध्यक्ष, सदस्य व नागरीकांनी आमदारांची भेट घेतली.

रवींद्र घरत पालघर:

पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा निवडून आल्यानंतर केळवारोड विभागात प्रथमच आज दि.24 रोजी  केळवारोड पुर्व पिलाजी नगर येथे शाळेच्या उद्घाटनप्रसंगी दौरा असल्याचे समजल्यानंतर अर्ध्या रस्त्यात कृती समिती केळवारोड समिती अध्यक्ष, सदस्य व नागरीकांनी आमदारांची भेट घेतली.आमदारांनी त्यांच्या चारचाकी वाहनातून उतरून पायी चालत खराब रस्त्याची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे कृती समिती केळवारोड झांझरोळी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मार्फत निवेदन देण्यात आले.(Palghar Assembly MLA Srinivasa Vanaga)

   झांझरोळी ते बंदाठे हा साधारण पणे 3.00 कि.मी. लांबीचा रस्ता असून  त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आदीवासी लोकवस्ती आहे. दुरवस्थेत रस्त्याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी त्या लोकप्रतिनिधींकडे व  शासनाकडे पाठपुरावा करुन देखील दाद घेत नसल्याने नागरिकांनी आंदोलने केली. मात्र कुठलाही प्रकारे या रस्त्याबाबत ठोस आश्वासन दिले नाही.

          त्यामुळे आज कृती समितीने पिलाजीनगर येथील शाळेच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, बोईसर चे आमदार राजेश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शहा यांना कृती समितीने दुरावस्थेत रस्त्याबाबत लक्ष वेधून  पायी चालत खड्डेमय रस्त्याची  पाहणी केली.   तसेच रस्त्याबाबत आमदारांना केळवेरोड कृती समितीच्या वतीने  निवेदन देण्यात आले. झांझरोळी बंदाठे रस्ता लवकरच दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन आमदारांनी ग्रामस्थांना दिले.

        यावेळी योगेश पाटील, माजी जि.प.सदस्य मनोहर मंहते,परेश घरत अध्यक्ष कृती समिती केळवारोड, प्रकाश सावर, रंजन जोशी, रामदास पाटील, संजय रिंजड,मुकेश भेरे, स्वप्नील पाटील, श्रेयस मंहते, मनोज भेरे, अक्षय राऊत, सचिन पाटील, मिहीर राऊत, किरण पाटील, सुनिल दिवा व इतर नागरीक उपस्थित होते.(Palghar Assembly MLA Srinivasa Vanaga)