पालघर नगर परिषदेतर्फे मच्छरांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी उघड्या सांडपाण्यात गप्पी मासे सोडण्याचा कार्यक्रम सुरू

पालघर नगरपालिका क्षेत्रातील मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ,पालघर नगर परिषद विविध उपाययोजना करत आहे.

पालघर नगर परिषदेतर्फे मच्छरांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी उघड्या सांडपाण्यात गप्पी मासे सोडण्याचा  कार्यक्रम सुरू
Palghar Municipal Council

पालघर नगर परिषदेतर्फे मच्छरांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी उघड्या सांडपाण्यात गप्पी मासे सोडण्याचा  कार्यक्रम सुरू

पालघर नगरपालिका क्षेत्रातील मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ,पालघर नगर परिषद विविध उपाययोजना करत आहे.

पालघर, रविंद्र घरत:

पालघर नगरपालिका क्षेत्रातील मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ,पालघर नगर परिषद विविध उपाययोजना करत आहे,  त्यातील एक उपाय योजना गप्पी माशाचे कल्टिवेशन करून ते गप्पी मासे उघड्या पाण्यात, उघड्या गटारात, उघड्या विहिरीत ,उघड्या तलावात, सोडून मच्छरांचा प्रादुर्भाव कमी करणे.(Palghar Municipal Council)


 गप्पी मासे मच्छरांच्या आळ्या खातात व मच्छरांचा प्रादुर्भाव कमी होतो.म्हणून पालघर नगरपरिषदेने गप्पी मासे कल्टिवेशन सुरू केले आहे. त्याची सुरुवात बुधवार दिनांक ५ जानेवारी रोजी करण्यात आली , त्या वेळेस पालघर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्ज्वला केदार काळे व पालघर चे सर्व नगरसेवकानी  जनतेला आवाहन केले आहे की  "आपल्या इमारतीचे ,आपल्या घराचे, सेफ्टी टॅंक नीट ठेवा, सेफ्टी टँक मधून सांडपाणी बाहेर येऊन देऊ नये, तसेच आपल्या घरातील उघडे पाणी झाकून ठेवा, यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.


 यावेळी पालघर नगराध्यक्ष डॉक्टर सौ उज्वला केदार काळे , पालघरचे उपनगराध्यक्ष उत्तम घरत , भाजपा गटनेते  भावानंद संखे ,आरोग्य सभापती श्री अक्षय संखे ,नगरसेविका अनुजा तरे , नगरसेविका राधा पामाळे  मानकामे , नगरसेवक चंद्रशेखर वडे व मान्यवर उपस्थित होते. मच्छरांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी प्रभावीपणे सुरू आहे, तसेच धुर  फवारणी व ईतर उपाय  सुरू आहेत.(Palghar Municipal Council)

❇️येथे तुम्हाला जगभरातील सर्व दैनंदिन बातम्या आणि अपडेट्स पाहायला मिळतील❇️

बातम्या , ब्लॉग्स???? , जीवनशैली????️, व्हायरल बातम्या कव्हरेज????, तंत्रज्ञान????, मनोरंजन????, जागतिक महामारी☣️, शिक्षण????, खेळ ???? आणि सर्व ऑनलाइन सांस्कृतिक अपडेट.

????वेबसाइटवर सामील व्हा????
  https://www.theganimikava.com/

???? WhatsApp वर सामील व्हा????
https://chat.whatsapp.com/ES371BM6vTZDtvgrMmAkT9

????फेसबुकवर लाईक करा ????
https://www.facebook.com/ganimikava7171/

???? टेलिग्रामवर सामील व्हा ????
https://t.me/+_Ufd-uoCW99hYWE1

???? Instagram वर फॉलो करा ????
https://www.instagram.com/theganimikava/