मोखाडा तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांची मागणी

परतीच्या पावसामुळे वीज,वारा,पाऊस जोरदार आल्याने मोखाडा तालुक्यातील खोडाळा विभागातील अनेक गावांना वीजपुरवठा खंडित झाला असून तो लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती प्रदीप वाघ यांनी केली आहे.

मोखाडा तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांची मागणी
Panchayat Samiti member Pradip Wagh

मोखाडा तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांची मागणी

परतीच्या पावसामुळे वीज,वारा,पाऊस जोरदार आल्याने मोखाडा तालुक्यातील खोडाळा विभागातील अनेक गावांना वीजपुरवठा खंडित झाला असून तो लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती प्रदीप वाघ यांनी केली आहे. 

परतीच्या पावसामुळे वीज,वारा,पाऊस जोरदार आल्याने मोखाडा तालुक्यातील खोडाळा विभागातील अनेक गावांना वीजपुरवठा खंडित झाला असून तो लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती प्रदीप वाघ यांनी केली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने गेले पाच-सहा दिवस नागरिकांना अंधारात राहावे लागले असून दिनांक 13 ऑक्टोबर वार बुधवार रोजी सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी अजूनही काही गाव पाड्यांमध्ये वीज आलेली नाही.(Panchayat Samiti member Pradip Wagh)

केवना़ळे,उधळे,हट्टी पाडा,खोडाळा येथील ट्रांसफार्मर खराब झाले आहेत हुंड्याची वाडी,पाचघर येथे देखील किरकोळ दुरुस्ती आहे.वीज खंडीत झालेल्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांनी प्रत्येक्ष भेट देऊन समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रदीप वाघ हे गेल्या दोन दिवसापासून महावितरणच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तसेच प्रत्यक्ष महावितरणच्या कार्यालयात भेट देऊन तालुक्याचा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वरील सर्व ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करून नवीन ट्रान्सफॉर्मर टाकण्याची मागणी पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता मनोहर जाधव यांच्याकडे केली आहे.(Panchayat Samiti member Pradip Wagh)