तरुणांना बरोबर घेऊन समाज संघटना बांधणार, तरुणांनी योगदान द्यावे - प्रदीप वाघ

तरूणांना बरोबर घेऊन समाज संघटना बांधणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य प्रदिप वाघ यांनी दि मोखाडा तालुक्यातील वाशाळा येथे महादेव कोळी समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित जयंती व वाघबारस कार्यक्रमात केले.

तरुणांना बरोबर घेऊन समाज संघटना बांधणार, तरुणांनी योगदान द्यावे - प्रदीप वाघ
Panchayat Samiti member Pradip Wagh

तरुणांना बरोबर घेऊन समाज संघटना बांधणार, तरुणांनी योगदान द्यावे - प्रदीप वाघ

तरूणांना बरोबर घेऊन समाज संघटना बांधणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य प्रदिप वाघ यांनी दि मोखाडा तालुक्यातील वाशाळा येथे महादेव कोळी समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित जयंती व वाघबारस कार्यक्रमात केले.

माधुरी आहेर मोखाडा:

तरूणांना बरोबर घेऊन समाज संघटना बांधणार असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य प्रदिप वाघ यांनी दि मोखाडा तालुक्यातील वाशाळा येथे महादेव कोळी समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित जयंती व वाघबारस कार्यक्रमात केले.यावेळी महादेव कोळी समाजाच्या नुकत्याच पदवी प्राप्त केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यंशवत विद्यार्थी,क्रिडा क्षेत्रातील यशस्वी खेळाडू यांना सन्मानित करण्यात आले.प्रदीप वाघ यांनी मार्गदर्शन करताना समाजा साठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे व तरुणांना सहकार्य केले पाहिजे असे आवाहन यावेळी केले.समाजा समोर असणा-या समस्या सोडविण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत देखील वाघ यांनी व्यक्त केले.(Panchayat Samiti member Pradip Wagh)

यावेळी समाज उन्नती मंडळाचे  प्रदीप वारघडे,किशोर स्वारी,अजय शेळकंदे,अमोल मोकाशी,तुषार फाळके, रघुनाथ पाटील,कमळाकर डामसे,विजयराव मुकणे,नरेंद्र मुकणे,जयराम वाघ,संजय वाघ,विठ्ठल गोडे,भुषण फाळके,राहुल झिंजुर्डे,नरेश घाणे,कमळाकर डामसे यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी  समाज उन्नती मंडळाचे मगन पाटील गुरूजी,भरत गारे गुरुजी,खोडे गुरुजी,जयराम गवते,भवारी,विश्वस्त,कार्यकारी मंडळाचे सदस्य,तरुण व महीला सदस्य उपस्थित होते.राजकीय मान्यवर कुसुम झोले,प्रदीप वाघ,दिलीप गाटे, मधुकर डामसे,सरपंच भवारी, मिलिंद झोले तसेच जव्हार, मोखाडा,वाडा व विक्रमगड तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.प्रदीप वारघडे सरचिटणीस यांनी प्रास्ताविक केले व भुषण फाळके यांनी आभार मानले.(Panchayat Samiti member Pradip Wagh)