आदिवासींच्या शिक्षणाची वाताहात केल्यास कदापी सहन करणार नाही - जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम

आदिवासींच्या शिक्षणाची वाताहात केल्यास कदापी सहन करणार नाही असे म्हणत जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम व जिल्हा परिषद सदस्या सारिका निकम यांनी थेट प्रकल्प अधिकारी आयुष्य सिंह यांच्याकडे पंचगणी स्कॉलर फाउंडेशन शाळेची तक्रार केली.

आदिवासींच्या शिक्षणाची वाताहात केल्यास कदापी सहन करणार नाही - जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम
Panchgani Scholar Foundation School

आदिवासींच्या शिक्षणाची वाताहात केल्यास कदापी सहन करणार नाही - जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम

आदिवासींच्या शिक्षणाची वाताहात केल्यास कदापी सहन करणार नाही असे म्हणत जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम व जिल्हा परिषद सदस्या सारिका निकम यांनी थेट प्रकल्प अधिकारी आयुष्य सिंह यांच्याकडे पंचगणी स्कॉलर फाउंडेशन शाळेची तक्रार केली.

माधुरी आहेर मोखाडा:

आदिवासींच्या शिक्षणाची वाताहात केल्यास कदापी सहन करणार नाही असे म्हणत जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम व जिल्हा परिषद सदस्या सारिका निकम यांनी थेट प्रकल्प अधिकारी आयुष्य सिंह यांच्याकडे पंचगणी स्कॉलर फाउंडेशन शाळेची तक्रार केली आहे.आदिवासी समाज शिकला तरच तो विकासाच्या मुख्य प्रवाहात येईन.मात्र पंचगणी स्कॉलर फौंडेशन सारख्या शाळा आदिवासींच्या शिक्षणाची वाताहात करत आहे.हे सहन केले जाणार नाही असेही प्रकाश निकम म्हणाले.यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे ज्येष्ठ नेते हरिचंद्र भोये व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाने नामांकित शाळेतील घरी बसलेल्या विद्यार्थ्यांना दोन दिवसात शाळेत दाखल केले नाही तर आम्ही दोन दिवसात सर्व पालक वर्ग प्रकल्प कार्यालयात शाळा भरून आदिवासी विद्यार्थ्यांचा छळ या कलमाखाली गुन्हा दाखल करायला लावू असेही जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी सांगितले.(Panchgani Scholar Foundation School)

जव्हारच्या आदिवासी विकास प्रकल्पाने निवड केलेले 148 विद्यार्थी पंचगणी येथील नामांकित शाळा सुरू होऊनही घरीच बसले आहेत.त्यांना प्रशिक्षणासाठी शाळेत बोलावले जात नसल्यामुळे पालक आक्रमक झाले असून त्यांनी गुरूवारी प्रकल्प कार्यालय जव्हार येथे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या नामांकित शाळेत वारंवार संपर्क करूनही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे.(Panchgani Scholar Foundation School)