पारधी हत्याकांडातील सर्व आरोपींना कडक शिक्षा द्यावी व पिडीतांचे पुनर्वसन करावे: प्रा.किशन चव्हाण

पाटोदा पारनेर येथे घडली हत्याकांडाची निर्दयी घटना ही मन सुन्न करणारी आहे. पारधी समाजावर रात्रीच्या अंधारात हल्ला करून जिवंत मारण्यात आले आहे. त्यांची झोपडी पेटवून देण्यात आली.

पारधी हत्याकांडातील सर्व आरोपींना कडक शिक्षा द्यावी व पिडीतांचे  पुनर्वसन करावे: प्रा.किशन चव्हाण
Pardhi murder case

पारधी हत्याकांडातील सर्व आरोपींना कडक शिक्षा द्यावी व पिडीतांचे  पुनर्वसन करावे: प्रा.किशन चव्हाण

पाटोदा पारनेर येथे घडली हत्याकांडाची निर्दयी घटना ही मन सुन्न करणारी आहे. पारधी समाजावर रात्रीच्या अंधारात हल्ला करून जिवंत मारण्यात आले आहे. त्यांची झोपडी पेटवून देण्यात आली.

बीड जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ शरणांगत:

बीड दि.२८पाटोदा पारनेर येथे घडली हत्याकांडाची निर्दयी घटना ही मन सुन्न करणारी आहे. पारधी समाजावर रात्रीच्या अंधारात हल्ला करून जिवंत मारण्यात आले आहे. त्यांची झोपडी पेटवून देण्यात आली,त्यामध्ये दोन वर्षाचा मुलगा जमिनीवरती आपटुन मारला गेला, ६०वर्षाचा वृध्द व्यक्ती हे मृत्य पावले आहेत. खोट्या चोरीच्या संशयाने हे पारधी हत्याकांड घडले आहे. या हल्यात जवळपास १० लोक जखमी झाले आहेत, तसेच महिलेवरतीही बलात्कार झालेला आहे. तरी पोलिस  तपास चक्र जलदगतीने फिरऊन कार्यवाही व तात्काळ पोलीस संरक्षण व तातडीने शासकीय निधीतून उपचार करावेत.(Pardhi murder case)

त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना भरीव अशी आर्थिक मदत देण्यात यावी. आज पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी हत्याकांड घडले आहेत ज्यावेळेस संपूर्ण गाव एखाद्या कुंटुंबास जिवंत मारत असेतील त्यावेळेस अशा गावांचा शासकीय विकास निधी बंद करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही बीड जिल्हाधिकारी याच्याशी  अशी चर्चा करताना प्रा. किसन चव्हाण यांनी सांगितले, सदरील हत्याकांडातील गावगुंडांना तात्काळ ॲट्रॉसिटी अंतर्गत 120 (ब), 302, 376, 354 कलम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. व तात्काळ यांच्यावरती कार्यवाही करावी.

हे प्रकरण गंभीर असून त्यातील तिसरा व्यक्ती देखील कोम्यामध्ये आहे. तरी या घटनेची दाहकता लक्षात घेवून मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिष्टमंडळ भेटले त्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, भटक्या-विमुक्तांची नेते प्रा विष्पु जाधव, संतोष जोगदंड, सचिन मेघडंबर, भगवंत वायबसे, पुरुषोत्तम वीर,निलेश साखरे,अंकुश जाधव,सुरेश पोतदार, पुष्पाताई तुरूकमाने, अँड,अनिता चक्रे,आकाश साबळे,युनुस शेख,पप्पु गायकवाड,किरण वाघमारे,शेख सुभान,अनुरथ वीर, संदिप जाघव,संदीप फंदे,चेतन पवार, शत्रुघन कस्बे, बाबा मस्के,मनोज चोरे,पंकज पंडित आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Pardhi murder case)